फुलंब्री 15 दिवसात उभारणार ऑक्सिजन प्लांट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : फुलंब्रीमध्ये पंधरा दिवसात ऑक्सिजन निर्मिती करणारा प्लांट उभारण्यात येणार आहे. फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयाला बडोदा येथील एका कंपनीकडून ऑक्सीजन निर्मिती करणारा प्लांट मिळाला आहे. हा प्लांट उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून प्रति मिनिट 160 लिटर ऑक्सिजनची निर्मिती केली जाणार आहे.

येत्या पंधरा दिवसांमध्ये हा प्लांट प्रत्यक्षात कृतीत उतरवल्या जाणार आहे. ग्रामीण भागातील ऑक्सीजन प्लांटची निर्मिती करणारे पहिले रूग्णालय म्हणून फुलंब्रीची ओळख होईल. बडोदा येथे कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या एफएमसी इंडिया या कंपनीने फुलंब्री ग्रामीण रुग्णालयाला 19 लाख किंमतीचा ऑक्सीजन प्लांट दिला आहे. या प्लांटचे सर्व मशिनरीज आणि विविध महत्त्वपूर्ण भाग रुग्णालयात दाखल झाले असून पंधरा दिवसात हा प्लांट कृतीत उतरणार आहे. यामूळे रुग्णालयात काम सुरू करण्यात आले आहे.

फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात 30 ऑक्सिजन बेडची व्यवस्था असून ऑक्सीजन प्लांट मधून एका मिनिटात 160 मीटर ऑक्सिजन निर्माण होणार आहे. हा ऑक्सीजन रुग्णांकरिता पुरेसा राहील अशी माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अभिजित खंदारे यांनी दिली आहे.

Leave a Comment