Friday, June 9, 2023

नानांच्या भूमिकेवर पवारांची नाराजी; म्हणाले की तसे असेल तर..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांकडून आरोप केले जात आहेत. या आघाडी सरकारमध्ये काहीतरी आलबेल घडत असल्याची शंकाही व्यक्त केली जात असताना काल काँग्रेसच्या नेत्यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मात्र, यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मात्र, पवारांच्या भेटीला गेले नाही. काँग्रेस नेत्यांच्या भेटीमध्ये नानांनी केलेल्या स्वबळाची वक्तव्यावर पवारांनी काँग्रेसच्या इतर नेत्यांकडे विचारणा करीत नाराजी व्यक्त केली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस 2024 मध्ये मोठा पक्ष असेल. आगामी निवडणूका स्वबळावर लढण्याबाबत पक्षनेतृत्व निर्णय घेईल, असे विधान केल्यानंतर त्यावर नाराज झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पवार म्हणाले कि, आगामी निवडणुकांमध्ये जर तुम्ही वेगळे लढणार असाल तर अगोदर सांगावे. मग आम्हालाही निवडणुकीत वेगळे लढण्यासाठी तयारी करता येईल. स्वबळाबाबत जर दिल्लीतील तुमच्या पक्षश्रेष्टींनी ठरवले असेल तर आम्हाला काहीच अडचण नाही.

मुंबईत झालेल्या महत्वाच्या भेटीवेळी काँग्रेसच्या नेत्यांना पवार असेही म्हणाले कि, प्रत्येक पक्षातील नेते आपापले पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. पक्ष वाढविण्यासंदर्भात कोणाच्याही मनात दुमत नाही. पण सोबत असलेल्या पक्षांना दुखावणेही योग्य नसल्याचे पवार यांनी यावेळी म्हंटले आहे.