सह्याद्री एक्सप्रेस आता फक्त पुणे पर्यंतच धावणार!; नेमकं कारण काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मध्य रेल्वे पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्यांची पुणे येथे रेल प्रबंधक कार्यालयामध्ये नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीमध्ये रेल्वेच्या अनुषंगाने अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी कराड अन् सातारा रेल्वेस्टेशन पुनर्विकासासाठी निधी मंजुर करण्यात आला. त्यामध्ये कराडसाठी 14 कोटी व सातारा साठी 21 कोटी रुपयाची तरतुद करण्यात आली. तसेच सह्याद्री एक्सप्रेस पुणेपर्यंतच नेण्याचा निर्णय घेण्यात आला.

पुण्यात पार पडलेल्या बैठकीत यावेळी पुणे विभागीय प्रबंधक इंदु दुबे, मध्य रेल्वे पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्य गोपाल तिवारी, डिव्हीजन कर्मशल मँनेजर डॉ. रामदास भिसे, ऐसीएम शैलभद्र गौतम,इतर अधिकारी उपस्थित होते.

वेळी मध्य रेल्वे पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्य गोपाल तिवारी यांनी काही महत्वाचे प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या प्रश्नांवर पुणे विभागीय प्रबंधक इंदु दुबे म्हणाल्या की, कराड व सातारा या स्थानकाचा अमृत भारत योजनेत पुनर्विकास केला जाणार आहे. यावेळी कराडसाठी 14 कोटी व सातारा साठी 21 कोटी रुपयाची तरतुद असून कामास लवकरच सुरवात होणार असल्याचे मुख्य वाणिज्य प्रबंधक डॉ. मिलिंद हिरवे यांनी यावेळी सांगितले.

कोल्हापूर मुंबई सह्याद्री एक्सप्रेस पुणेपर्यंत सोडण्याचा व सकाळच्या सत्रामध्ये कोल्हापूर कलबुर्गी एक्सप्रेस सुरू करणे, दादर पंढरपूर एक्सप्रेसचा मिरज पर्यंत विस्तार करणे व साप्ताहिक कोल्हापूर सिकंदराबाद व्हाया कलबुर्गी एक्सप्रेस सुरू करणे तसेच मिरज पुणे व मिरज कोल्हापूर या विभागांमध्ये काही एक्सप्रेस गाड्यांना वलिवडे, रुकडी, सांगली, किर्लोस्करवाडी, ताकारी, कराड, मसुर, तारगाव व सातारा लोणंद जेजुरी येथे थांबा देण्यात येणार आहे. तसेच काही स्थानकांवर थांबा सुरु झाल्याचे सीनियर डिव्हिजन ऑपरेटर मॅनेजर डॉ. स्वप्निल नीला यांनी सांगितले.

यावेळी पार पडलेल्या बैठकीत किशोर भोरावत (मिरज), शिवनाथ बियाणी (कोल्हापुर), निखिल कांची (पुणे), बशीर सुतार(पिंपरी), बाबासाहेब शिंदे (पुणे), सुरेश माने (पुणे), दिलीप बटवाल (चाकण), अजित चौगुले. आदि मध्य रेल्वे पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्य उपस्थित होते.