कराड दक्षिणसाठी 7 कोटी 75 लाखांचा निधी मंजूर; कोणत्या गावात काय कामे होणार याची लिस्ट पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिण साठी जिल्हा नियोजन मधून 7 कोटी 75 लाख रु. इतका भरघोस निधी मंजूर झाला आहे. या निधीतून रस्ते, पथदिवे, वस्त्यांचे विद्युतीकरण, शाळेच्या खोल्या बांधणे, ओढ्यावर साकव बांधणे, साठवण बंधारे, ग्राम तलाव दुरुस्त करणे, सोलर दिवे बसवणे, ग्रामपंचायत तसेच स्मशानभूमी यांना संरक्षण भिंत बांधणे, सामाजिक सभागृह बांधणे, बंदिस्त गटार करणे, स्मशानभूमी सुधारणा करणे, खडीकरण व काँक्रिटीकरण इत्यादी विविध विकास कामे या निधीमधून होणार आहेत.

या मंजूर निधीमधून येणपे येथे वाढीव वस्तीमध्ये जादा पोल उभारणेसाठी रु. ८ लाख, धोंडेवाडी गावठाणमध्ये नवीन डीपी उभारणेसाठी – रु. ५ लाख, वहागाव येथील स्ट्रीट लाईटसाठी ४५ पोल उभारणेसाठी-रु. १० लाख, वडगाव हवेली येथील एस टी स्टॅन्ड पाठीमागील वस्तीतील धोकादायक विद्युत तारा स्थलांतरित करणेसाठी रु. ३ लाख, सैदापूर येथे संगम कॉलोनी येथे अंडरग्राउंड केबल करून मिळणेबाबत-रु. ५ लाख, घोगाव येथील नायकवडी वस्ती येथे नवीन डीपी बसविणेकरीता-रु. २ लाख, कोयनावसाहत येथील शिवराज हौसिंग सोसायटी रस्ता पथदिवे बसविण्यासाठी-रु. ५ लाख, वारुंजी ता. कराड येथील धोकादायक पोल रस्त्यावरून स्थलांतर करणे व वाढीव वस्तीपर्यंत नवीन विद्युत पुरवठा करणेसाठी -रु. ५ लाख, पोतले येथे वाढीव वस्ती विद्युतीकरण करणे – रु. ४ लाख, सवादे येथील वाढीव वस्ती विद्युतीकरण करणे – रु. ४ लाख, उंडाळे येथील गट न ९६५ मधील ११ केव्ही लाईनचे ५ पोळ शिफ्ट करणे-रु. ३.५० लाख, ओंड येथे वाढीव वस्ती विद्युतीकरण करणे-रु. ५ लाख, नांदगाव येथे वाढीव वस्ती विद्युतीकरण करणे-रु. ५ लाख, खुबी येथील रहिवासी भागातून घरावरून गेलेली ११ केव्ही उच्च दाब वाहिनी स्थलांतरित करणे-रु. २ लाख, धोंडेवाडी येथील बेघर वसाहत येथे नवीन रोहित्र उभारणे-रु. ४ लाख, येणपे येथे वाढीव वस्ती विद्युतीकरणसाठी अतिरिक्त १०० केव्हीचे रोहित्र उभारणे-रु. ७.५० लाख, कासारशिरंबे येथील ज़िल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दोन खोल्या बांधणेसाठी-रु. १७.९२ लाख, शेळकेवाडी येथील अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे-रु. ५ लाख, उंडाळे येथील अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे-रु. ५ लाख, पाटीलवाडी (म्हा.)-रु. ५ लाख, तुळसण येथे मागासवर्गीय वस्तीकडे जाणाऱ्या ओढ्यावर साकव बांधणे-रु. ३५.१७ लाख, काटेकरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या १ खोली बांधणीसाठी-रु. ११.८२ लाख, काले येथील जिल्हा परिषद शाळेच्या ३ खोली बांधणीसाठी रु. ३५.४६ लाख, कोडोली येथील जिल्हा परिषद शाळेच्या २ खोली बांधणीसाठी २३.६४ लाख, खुबी येथील जिल्हा परिषद शाळेच्या ४ खोली बांधणीसाठी ३९.६४ लाख, नांदलापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या २ खोली बांधणीसाठी २३.६४ लाख, पेरले येथील जिल्हा परिषद शाळेच्या २ खोली बांधणीसाठी शिंगणवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या १ खोली बांधणीसाठी ११.८२ लाख, शेणोली येथील जिल्हा परिषद शाळेच्या १ खोली बांधणीसाठी ११. ८२ लाख, साळशिरंबे येथील जिल्हा परिषद शाळेच्या १ खोली बांधणीसाठी ११.८२ लाख, विठोबाचीवाडी येथील जि प शाळेची खोली दुरुस्ती साठी – रु. ३ लाख, कापील येथे जि प प्राथमिक शाळेची खोली दुरुस्त करणे साठी रु. ३ लाख, गोंदी येथील जि प शाळेच्या ४ खोल्या दुरुस्ती करणेसाठी रु. १० लाख, कापील जि प प्राथमिक शाळेची खोली दुरुस्त करणे साठी रु. ३ लाख, कार्वे जि प प्राथमिक शाळेची खोली दुरुस्त करणे साठी रु.६ लाख, गोंदी जि प प्राथमिक शाळेची खोली दुरुस्त करणे साठी रु.२.५० लाख, चचेगाव जि प प्राथमिक शाळेची खोली दुरुस्त करणे साठी रु.२ लाख, पाचपुतेवाडी जि प प्राथमिक शाळेची खोली दुरुस्त करणे साठी रु.४.५० लाख, प्रतिभानगर (काले) जि प प्राथमिक शाळेची खोली दुरुस्त करणे साठी रु.३ लाख, विठोबाचीवाडी जि प प्राथमिक शाळेची खोली दुरुस्त करणे साठी रु.७ लाख, कापील येथील जि.प.प्राथमिक शाळेची खोली दुरुस्त करणेसाठी रु. ३ लाख, कार्वे येथील जि.प.प्राथमिक शाळेची खोली दुरुस्त करणेसाठी रु. ३ लाख, गोंडी येथील जि.प.प्राथमिक शाळेची खोली दुरुस्त करणेसाठी रु. १० लाख, घारेवाडी येथील साठवण बंधारा बांधणेसाठी रु. २४ लाख, शेवाळेवाडी (येवती) येथील साठवण बंधारा बांधणीसाठी रु. १७ लाख, चौगुलेमळा येथील ग्रामपंचायत संरक्षणभिंत बांधणीसाठी रु. ५ लाख, पवारवाडी (तारूख) येथे अंतर्गत रस्ता सुधारणा करणेसाठी रु. ५ लाख, बेलवडे बु. येथील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता सुधारणा करणेसाठी रु. ५ लाख, महारुगडेवाडी येथील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता सुधारणा करणेसाठी रु. ५ लाख, शेणोली येथील स्मशानभूमी अंतर्गत काँक्रिटीकरण व शेड बांधणीसाठी रु. १० लाख, शेळकेवाडी (म्हा) येथील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता सुधारणा करणेसाठी रु. ५ लाख, हणमंतवाडी (येवती) येथील ओढ्याकाठी संरक्षणभिंत बांधणीसाठी रु. ५ लाख, कासारशिरंबे येथील स्मशानभूमी सुधारणा करणेसाठी रु. ५ लाख, घोणशी येथील स्मशानभूमीला संरक्षक भिंत बांधणीसाठी रु. ५ लाख, खोडशी येथील दफनभूमी सुधारणा करणेसाठी रु. ५ लाख, आणे येथील स्मशानभूमीसह कंपाउंड गेट बसविणेसाठी रु. ५ लाख, पाचवड येथील स्मशानभूमीचे पेव्हर ब्लॉक बसविणेसाठी रु. ५ लाख, किरपे येथील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता काँक्रिटीकरण करणेसाठी रु. ५ लाख, वहागाव येथील ग्रामपंचायत कार्यालय बांधणीसाठी रु. १२ लाख, वडगाव हवेली येथील बंदिस्त गटर बांधणीसाठी रु. १० लाख, गोळेश्वर येथे बंदिस्त गटर बांधणीसाठी रु. ५ लाख, आटके येथे बंदिस्त गटर बांधणीसाठी रु. ५ लाख, वारुंजी येथे अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणेसाठी रु. १० लाख, कार्वे येथील अंतर्गत आर सी सी गटर सह रस्ता काँक्रिटीकरण करणेसाठी रु. ५ लाख, शेरे येथील अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणेसाठी रु. १० लाख, विंग येथील अंतर्गत रास्ता काँक्रिटीकरण आर सी सी गटर करणेसाठी रु. ५ लाख, कार्वे येथील धानाई मंदिर परिसर सुधारणा करणेसाठी रु. ५ लाख रुपये मंजूर झाला आहे.

तसेच घारेवाडी येथील धुळेश्वर देवस्थान परिसरात येणाऱ्या भाविकांसाठी पाझर तलाव ते मंदिरापर्यंत रस्ता सुधारणा करणे व पिण्याच्या टाकी व पाईपलाईन साठी रु. ८ लाख, पाचवडेश्वर-नारायणवाडी येथे पाचवडेश्वर मंदिर लगत उत्तर बाजूस संरक्षक भिंत बांधणे व मंदिर परिसर सुधारणा करणेसाठी रु. ५ लाख, रेठरे खुर्द येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोरचा परिसर सुधारणा करणेसाठी रु. १५ लाख, वानरवाडी येथील ओढ्यावर साकव बांधणे रु. ३५.३७ लाख, सवादे येथील ओढ्यावर साकव बांधणेसाठी रु. ३३ लाख, रा.मा. ४ ते वहागाव घोणशी कोपर्डे हवेली पार्ले बनवडी रस्ता इजिमा १२५ सुधारणा करणेसाठी (आरसीसी गटर सह) रु. ४० लाख, कपिल कोडोली इजिमा ११९ सुधारणा करणेसाठी (आरसीसी गटरसह) रु. ३० लाख, येवती घराळवाडी मस्करवाडी चव्हाणवाडी धामणी डाकेवाडी निवी रस्ता इजिमा १३० कराड हद्द सुधारणा करणेसाठी रु. २५ लाख, बोत्रेवाडी, जिंती, शेवाळवाडी ग्रामा ३०३ सा क्र ०/०० ते २/०० सुधारणा करणेसाठी रु. ३० लाख, काले बेंदमळा, धोंडेवाडी रस्ता ग्रामा २८२ सा क्र ०/०० ते २/०० सुधारणा करणेसाठी रु. २५ लाख, प्रजिमा ५५ शिंगणवाडी, कोळे, पाटीलमळा, कराळवाडी ते आणे जोडरस्ता (भाग-आणे ते विकासनगर) सुधारणा करणे रु. ३० लाख, चचेगाव, येरवळे, पोतले, काळेपाणंद रस्ता ग्रामा १६२ (चचेगाव भाग) सुधारणा करणेसाठी रु. २० लाख.
असा एकूण ७ कोटी ७५ लाख रुपये इतका भरघोस निधी कराड दक्षिण साठी जिल्हा नियोजन मधून आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला असून या निधीमधून कराड दक्षिण मधील गावांमध्ये हा निधी मिळाला असून लवकरच हि सर्व कामे सुरु होतील.