आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे 71 कोटी 25 लाखांचा निधी मंजूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे जुलैच्या पुरवणी अर्थसंकल्पात सातारा- जावळी तालुक्‍यातील 15 रस्त्यांची सुधारणा, मजबुतीकरण करण्यासाठी तब्ब्ल 71 कोटी 25 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.‌

भाजप सरकार आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा- जावळी मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला असून आगामी काळात मतदारसंघातील प्रस्तावित सर्व कामेही फडणवीस यांच्या सहकार्यातून मार्गी लागतील, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.

जुलैच्या पुरवणी अर्थसंकल्पात आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रस्तावानुसार महत्वाच्या कामांना निधी मंजूर करण्यात आला आहे. जावळी तालुक्‍यातील पाचगणी- कुडाळ रस्ता 25 किलोमीटरची सुधारणा करणे व रुंदीकरण करणे यासाठी 5 कोटी 80 लाख, दिवदेव मार्ली भालेघर आखाडे रस्ता सुधारणा करण्यासाठी 3 कोटी 60 लाख, आनेवाडी सायगाव, मोरघर, वाघेश्‍वर सुधारणा करण्यासाठी 5 कोटी, भिलार उंबरी धावली, आलेवाडी खिंड रेंडी मुरा कुंभारगणी मोरखिंड जननीमाता मंदिर मोरावळे रस्ता सुधारणा करण्यासाठी 5 कोटी, गोगावे वारसोळी गाळदेव वाघदरे म्हाते गांजे तांबी खरोशी निझरे, कामथी वेळे कण्हेर रस्ता सुधारणा करण्यासाठी 8 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे.

सातारा तालुक्‍यातील शेंद्रे सातारा बाह्यवळण शेंद्रे ते बोगदा रस्त्याची सुधारणा करण्यासाठी 3 कोटी, मर्ढे ते लिंब बसाप्पाची वाडी आरळे पाटखळ वाढे म्हसवे वर्ये नेले धावडशी आकळे ते रस्ता सुधारणा करण्यासाठी 1 कोटी, भोंदवडे अंबवडे बु. सायळी वडगाव सावली कुरूलबाजी कुडेघर रोहोट पाटेघर आलवडी धावली रस्ता भाग अंबवडे ते सायळी), (भाग पाटेघर ते आलवडी) रस्त्याचे रुंदीकरण, डांबरीकरण व संरक्षक भिंत बांधणे 8 कोटी, सातारा गजवडी ठोसेघर चाळकेवाडी पाटण रस्ता (भाग बोगदा ते गजवडी फाटा) रस्त्याचे रुंदीकरण, सुधारणा करण्यासाठी 8 कोटी, परळी बनघर कुस खुर्द, कुस बु. खडगाव ताकवली निगुडमाळ नित्रळ कातवडी केळवली धनगरवाडी, धावली ते (भाग खडगाव ते धावली) रस्त्याची सुधारणा करणे 8 कोटी 50 लाख, परळी बनघर कूस खुर्द, कूस बु. खडगाव ताकवली निगुडमाळ नित्रळ कातवडी केळवली धनगरवाडी, धावली रस्त्याची सुधारणा करणे 1 कोटी 85 लाख, शिवाजीनगर भाटमरळी मांडवे पिरेवाडी ते निवडुंगवाडी रस्ता (भाग शिवाजीनगर भाटमरळी ते मांडवे) सुधारणा करणे 4 कोटी 50 लाख रुपये.

शेंद्रे वेचले डोळेगाव भाटमरळी कुसवडे नरेवाडी रस्ता (भाग डोळेवाडी ते भाटमरळी ते कुसवडे) सुधारणा करणे 2 कोटी 50 लाख, भोंदवडे अंबवडे बु. सायळी वडगाव सावली कुरूलबाजी कुडेघर रोहोट पाटेघर आलवडी धावली रस्ता (भाग आलवडी ते धावली) रस्त्याचे संरेखन सर्व्हेक्षण व सुधारणा करणे यासाठी 5 कोटी तर मर्ढे ते लिंब बसाप्पाची वाडी आरळे पाटखळ वाढे म्हसवे वर्ये नेले धावडशी आकले ते (भाग मर्ढे, लिंब ढगेवाडी) सुधारणा करणे यासाठी 1 कोटी 50 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.

आपटी- तापोळा पुलासाठी 150 कोटी :- निसर्संगपन्नतेने नटलेल्या जावळी तालुक्‍यातील शिवसागर जलाशय परिसरात पर्यटन वाढावे आणि परिसरातील ग्रामस्थ व पर्यटकांना दळणवळण सुखकर आणि सोयीचे व्हावे यासाठी शिवसागर जलाशयावर आपटी ते तापोळा या मोठ्या पुलाचे काम मार्गी लावण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांचा पाठपुरावा सुरु होता. त्यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून या पुलाच्या बांधकामासाठी तब्बल 150 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या कामाला निधी दिल्याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. तसेच बामणोली ते दरे दरम्यान कोयना जलाशयावर केबल स्टे पुलाचे बांधकाम, व्हिविंग गॅलरी करणे या कामासाठी 300 कोटी रुपये मंजूर झाले असून यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभर मानले आहेत.