आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिणसाठी 7 कोटी 76 लाख रुपयांचा निधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिणसाठी ७ कोटी ७६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये स्थानिक विकास निधीमधून (आमदार फंड) ५ कोटी ७६ लाख रुपये तसेच राज्याच्या अर्थसंकल्पातून शेरे येथे रस्त्याच्या भूसंपादनासाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या माध्यमातून कराड दक्षिण मधील विंग, पोतले, घारेवाडी, वनवासमाची (खोडशी), गोटे, वारुंजी, रेठरे खुर्द, शेरे, घोगाव, टाळगाव, कालेटेक, किरपे, वाठार, तुळसण, ओङोशी, पवारवाडी-नांदगाव, आटके, कापील-पाचवडवस्ती, कार्वे, गोळेश्वर, मालखेड या गावांमध्ये आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर झाला आहे.

आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्थानिक विकास निधीतून सैदापूर येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण व गटर करणे ९ लाख ९६ हजार रुपये, कराड ग्रामीण मधील विठठल नगर येथील विविध सार्वजनिक रस्ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मालकीच्या जागेत कॉक्रीटीकरण १० लाख, गोळेश्वर येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत येथील वृंदावन कॉलनी-१ अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण साठी ९ लाख ९० हजार, कराड नगरपालिका हददीतील खराडे कॉलनी येथे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मालकीच्या सामाजीक सभागृह बांधणेसाठी १५ लाख, चचेगाव येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत मातंग वस्तीमध्ये संरक्षण भिंत व आर.सी.सी. गटर बांधणेसाठी ७ लाख, उंडाळे येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत मारूती मंदिर ते महादेव मंदिर रस्ता डांबरीकरण साठी ५ लाख, नारायणवाडी येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण साठी ७ लाख, कोयनावसाहत येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत येथील वार्ड नं.१ वत्सलानगर मध्ये ४०० मीटर लांबीचे २ बाय २ चे बंदिस्त गटर बांधणेसाठी ५ लाख, जखिणवाडी येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत सचिन गाडे ते पूर्वेस थोरात वस्तीमध्ये आर.सी.सी. पाईप बंदिस्त गटरसाठी ३ लाख, जखिणवाडी येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत कणसेमळा ते धाणमार्ग रस्ता खडीकरण व डांबरीकरण ४ लाख, कराड दक्षिण मतदार संघातील नऊ प्राथमिक आरोग्य केंद्र व उप प्राथमिक आरोग्य केंद्र यांना प्रत्येकी एक प्रोजेक्टर, स्क्रीन,ऑल इन वन प्रिंटर,ऑल इन वन संगणक कॅमेरा सह व संगणक टेबल खुर्ची इत्यादी साहित्यांसाठी १६ लाख ७० हजार, वहागाव येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत छ.शिवाजी महाराज पुतळयापासून ते सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वहागाव पर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण साठी ९ लाख, घोणशी येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत प्रकाश जाधव यांचे घर ते अधिक पवार यांच्या घरापर्यंतचा रस्ता कॉक्रीटीकरण ७ लाख, किरपे येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत येथील श्री क्षेत्र नारायण मंदिर ते महादेव मंदिर रस्ता खडीकरण व डांबरीकरणसाठी १० लाख, कुसुर येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत अंतर्गत रस्ता मुरमीकरण व कॉक्रीटीकरण ५ लाख, कराड येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत शनिवार पेठ कोयनेश्वर मंदिराकडे जाणा-या रस्त्याच्या दोन्ही बाजूस बंदीस्त आर.सी.सी. गटर ९ लाख ९९ हजार, कराड येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत रेठरेकर कॉलनी,मुजावर कॉलनी येथील शब्बीर मुजावर यांचे घरापासून असीफ सुतार यांचे घरापर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरणसाठी १० लाख, कराड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येवती,काले,रेठरे,वडगाव हवेली व कोळे येथे वैद्यकीय यंत्रसामग्री व साहित्य खालील तक्त्याप्रमाणे पुरविणे ६४ लाख ५६ हजार, कराड येथे नगरपरिषद मालकीच्या जागेत रेठरेकर कॉलनी,मुजावर कॉलनी येथील निझाम काझी यांचे घरापासून इनामदार यांचे प्लॉट पर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण १० लाख, कराड येथे नगरपरिषद मालकीच्या जागेत शनिवार पेठ येथील दरवेशी वस्तीमध्ये आर.सी.सी गटर १० लाख, कापील येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत येथील वार्ड नं.४ मधील अंतर्गत रस्ते कॉक्रीटीकरण १० लाख, रेठरे खुर्द येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत अशोक मोहिते यांच्या घरापासून ते शिवाजी मोहिते यांच्या घराकडे जाणारा रस्ता कॉक्रीटीकरण ७ लाख, मलकापूर येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत येथील नॅशनल हायवे क्र.४ हेम मोटर्स ते केएसटी पार्क,मलकापूर (नितीन थोरात) यांचे घरापर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण १० लाख, गोळेश्वर येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत येथील वृंदावन कॉलनी-१ अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण १० लाख, गोवारे येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत अंतर्गत आर.सी.सी. गटर ५ लाख, आटके येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत मुकुंद महाराज मंदिराशेजारील स्मशानभूमीची सुधारणा ४ लाख ७९ हजार, शेणोली येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत येथील गाव पूल ते स्मशानभूमी दफनभूमी रस्ता खडीकरण व डांबरीकरण ६ लाख ९८ हजार, काले येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत अशोक आकाराम पाटील यांच्या घरापासून ते स्वप्नील अशोक पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता डांबरीकरण १० लाख, काले येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत सुनिल श्रीरंग पाटील यांचे घरापासून ते राजेंद्र पाटील यांचे घरापर्यंतचा रस्ता डांबरीकरण १० लाख, गोवारे येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण ५ लाख ९९ हजार, विंग येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण ५ लाख, गोटेवाडी (मुळीकवाडी) येथे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मालकीच्या जागेत सामाजिक सभागृह बांधणे ७ लाख, कराड शहर येथे नगरपालिका मालकीच्या जागेत येथील पोलिस स्टेशन आवारात प्रतिक्षालय बांधणे १० लाख, घारेवाडी येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत येथील स्मशानभूमीत दहनशेड बांधणे ७ लाख, धोंडेवाडी येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत येथील अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण १० लाख, शेवाळवाडी (म्हासोली) येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत बाळासो शंकर पाटील यांचे घरापासून ते जुगाई माता मंदिर रस्ता कॉक्रीटीकरण १० लाख, चोरमारवाडी (येणपे) येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत येथील मारूती मंदिराच्या समोरून ते बाबुराव ज्ञानू चोरमार यांच्या उकिरडयापर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण ७ लाख, खोडशी येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत उस्मान आंबेकरी यांचे घरापासून ते महादेव मंदिरापर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण १० लाख, सैदापूर येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत येथील विद्यानगर येथे श्री चावडीमनी यांचे घर ते सिल्वर ओक रेसिडन्सी रस्ता कॉक्रीटीकरण १० लाख, सैदापूर येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत आण्णानांगरे नगर येथे बंदिस्त गटर ५ लाख, उंडाळे येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत अंतर्गत रस्ता खडीकरण व डांबरीकरण १० लाख, कुसूर येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत येथील अंतर्गत रस्ता खडीकरण ७ लाख, चचेगाव येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत विश्वनाथ पवार ते संदिप पवार ते मोरी पूलापर्यंत गटर बांधणे ७ लाख, आणे येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत विकासनगर येथे ओढयाकाठी संरक्षक भिंत बांधणे १० लाख, बेलवडे बु. येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत प्रकाश माने यांच्या घरापासून नागोबा मंदिर पर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण १० लाख रूपये मंजूर झाले आहेत.

मालखेड येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत शिवाजी दत्तू लोकरे ते निलेश दत्तात्रय पवार ते संजय रंगराव माने यांच्या घरापर्यंत अंतर्गत गटर करणे १० लाख, गोवारे येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत येथील शिवाजी कदम यांच्या घरापासून ते रशिद मुलाणी यांच्या घराकडे जाणारा रस्ता कॉक्रीटीकरण करणे ७ लाख, शिंदेवाडी (विंग) येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत ग्रामपंचायत कार्यालयाची सुधारणा करणे १० लाख, कार्वे येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत गोपाळनगर येथे अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण करणे१० लाख, नांदगाव येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत येथील अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण करणे ५ लाख, कोयनावसाहत येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत संभाजी देवकर यांच्या घरापासून ते शिवाजी चौक येथे रस्ता कॉक्रीटीकरण १० लाख, नांदलापूर येथे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेत सामाजिक सभागृह बांधणे १० लाख, कार्वे येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत येथील बिरोबा मंदिरासमोर सामाजिक सभागृह बांधणे १५ लाख, येरवळे येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत येथील स्मशानभूमीची (पदपथ तयार करून पेव्हरब्लॅाक बसविणे. भिंतीला रंगदेणे इत्यादी) सुधारणा ५ लाख, येणपे येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत अंतर्गत रस्ता खडीकरण व डांबरीकरण १० लाख, कार्वे येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत येथील ग्रामपंचायत मालकीचे सभामंडप दुरूस्तसाठी १० लाख, सवादे येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत येथील मातंगवस्तीतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेस संरक्षक भिंतीसह सुधारण करणे १० लाख, कालवडे येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत येथील अमृत थोरात ते पिराप्पा गाडे यांच्या घरापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूस आर.सी.सी. बंदिस्त गटर बांधणे ७ लाख, पोतले येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण करणे ५ लाख ५० हजार, विंग येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत मुस्लीम समाज दफनभूमी ते वेताळबा मंदिर रस्ता कॉक्रीटीकरण करणे.५ लाख, वाठार येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत येथील एम.एस.ई.बी. ऑफिस पासून ते मागासवर्गीय वस्ती पर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण १० लाख असा एकूण ५ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी स्थानिक विकास निधीमधून मंजूर झाला आहे.

तसेच राज्याच्या वार्षिक अंदाजपत्रकात कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील शेरे ता. कराड येथील शेरे ते मुतालिक पाणंद रस्ता राज्य मार्ग क्र ७५, भूसंपादन करणेसाठी २ कोटी रुपये इतका निधी मंजूर झाला आहे. माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील गावांमध्ये निधी मिळावा यासाठी प्रयत्न केला असून मतदारसंघातील प्रत्येक गावात आवश्यक तितका निधी यावा यासाठी आ. चव्हाण यांचे प्रयत्न असतात. या मंजूर विकासनिधीतून गावागावांमध्ये विकासकामे सुरु होतील ज्याचा तेथील जनतेला सोयी सुविधा मिळण्यात फायदा होणार आहे.

Leave a Comment