Tuesday, February 7, 2023

माझी ताकद जास्त की मुख्यमंत्री ठाकरेंची ते पाहूया; नवनीत राणांचे खुलं आव्हान

- Advertisement -

अमरावती | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगा आणि हनुमान चालीसा यावरून राज्य सरकारला घेरले असतानाचा अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी राज ठाकरेंच्या सुरत सूर मिसळत आपण मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा म्हणणार आहे असे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना दिले होते. त्यानंतर आज राणा यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे. माझी ताकद जास्त की मुख्यमंत्री ठाकरेंची? असा सवाल राणा यांनी केला आहे.

आज नवनीत राणा व रवी राणा हे अमरावतीच्या हनुमान मंदीरात जाऊन हनुमान चालीसा म्हणणार आहेत. हनुमान चालीसा म्हणण्यापूर्वी त्यांनी आपल्या अमरावती शहरातील निवास्थानी नागरिकांना भोंगे वाटप केले. आपल्या भागात हनुमान मंदिर आहे. त्या भागात हनुमान मंदिरावर भोंगे लावून हनुमान चालीसा लावा व पठण करा असा आवाहन देखील रवी राणा यांनी केला आहे.

- Advertisement -

मी मातोश्री वर हनुमान चालीसा वाचायला नक्की येईन, मला फक्त थांबवून दाखवा, माझी विदर्भाची ताकद जास्त आहे की तुमची मुख्यमंत्री म्हणून ताकद जास्त आहे हे आपण पाहूया अस म्हणत नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंना खुल आव्हान दिले आहे

यावेळी रवी राणा यांच्या घरी जागा वाटपासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. यावेळी जय श्री रामचे नारे देखील त्यांनी लावले. राणा मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात भाजप अन् शिवसेना यांच्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे.