कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
माजी जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात यांच्या प्रयत्नातून कामथी गावासाठी 45 लाख रुपयांचा भरघोस निधी मंजूर झाला आहे. या निधीतून गावच्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी जल जीवन मिशन योजने अंतर्गत 40 लाख रुपये निधी तर दलित वस्ती योजनेतून रस्त्यांचे काँक्रिटीकरणासाठी 5 लाख रुपये असा निधी मंजूर झाला आहे. या मंजूर दोन्ही कामांचे भूमिपूजन माजी जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
यावेळी कामथी गावचे सरपंच प्रकाश खंडागळे, उपसरपंच पोपट मदने, कराड उत्तर युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रवीण वेताळ, माजी सरपंच बाबासो खंडागळे, सोसायटी चेअरमन सुनील खंडागळे, सुर्लीचे सरपंच दत्तात्रय वेताळ, ग्रा. प. सदस्य सुदेश वेताळ, राहुल वेताळ, अमित फुके, रामचंद्र चव्हाण, शिवाजी खंडागळे, दत्तात्रय खंडागळे, प्रकाश मोहिते, लक्ष्मण खंडागळे, सर्जेराव चव्हाण, यशवंत माने सर, संदीप खंडागळे, संतोष मोरे, मोहन खंडागळे, संभाजी पवार, विनोद मोहिते आदींच्यासह कामथी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी निवास थोरात म्हणाले की, कामथी गावासाठीची पाणी योजनेची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती यासाठी मागील 3-4 वर्षांपासून प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करून निधी मिळवता आला. पाणी योजनेची गरज लक्षात घेऊन जल जीवन मिशन योजनेतून या योजनेचा गावाला मोठा फायदा होऊ शकणार आहे. कोपर्डे जिल्हा परिषद गटामध्ये गेल्या पाच वर्षात कोट्यावधी रुपयांचा निधी आणता आला तसेच प्रत्येक गावातील पायाभूत सुविधेची अनेक कामी मार्गी लावता आली.