अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांचा हल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांचा हल्ला झाल्याची घटना नुकतीच पुणे- बंगळुरु महामार्गावरील कराड तालुक्यातील तासवडे टोलनाका हद्दीत घडली. यावेळी सयाजी शिंदे यांना डोळ्याच्यावर आणि मानेला एक माशी चावली. यावेळी रस्ता रुंदीकरणाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सयाजी शिंदेयांना त्यांच्या गाडीत बसवले.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण सुरु असल्यामुळे तासवडे टोलनाका हद्दीत वृक्ष पुर्नरोपणाचे काम सुरु आहे. या ठिकाणी आज सकाळी अभिनेते सयाजी शिंदे पोहचले. त्यांनी वृक्ष वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांना वृक्षाच्या सभोवतालचे काम करण्यासाठी मार्गदर्शन करत होते. यावेळी मधमाशांनी शिंदे यांच्यासह तेथील काही कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी सयाजी शिंदे यांना त्यांच्या गाडीमध्ये बसवले. यानंतर शिंदे यांनी गाडीत बसून एक व्हिडीओ तयार करून त्याद्वारे आपल्यावर मधमाशांचा हल्ला झाला असून आपण सुखरुप असल्याची माहिती माध्यमांना दिली.

अभिनेते आणि वृक्षप्रेमी असलेले सयाजी शिंदे यांनी त्यांच्या सह्याद्री देवराई या संस्थेच्या माध्यमातून अनेक वृक्षांची लागवड केली आहे. सयाजी शिंदे हे लोकांना झाडे लावण्याचा संदेश देतात. राज्यभरातील जी काही खुप जुनी झाडे आहेत, त्यांची माहिती एकत्र करण्यासाठी सह्याद्री देवराईच्या माध्यमातून ते प्रयत्न करता आहेत. दरम्यान महामार्गालगत वृक्षाचे पुर्नरोपन‌ सुरु असताना झाडावरील मधमाशांनी सयाजी शिंदेंसह इतर लोकांवर हल्ला केला.