सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
दहिवडी पोलीस स्टेशनला पदभार स्वीकारल्यानंतर सपोनि अक्षय सोनवणे यांनी दहिवडीसह परिसरातील दोन नंबरच्या धंद्यांना चांगलाच दणका द्यायला सुरुवात केली. त्याच अनुषंगाने दहिवडी पोलिसांनी अशीच एक धडक कारवाई गोंदवल्यात जुगार अड्ड्यावर केली आहे. या छाप्यात पत्त्याची पाने, रोख रक्कम 16 हजार 240 रुपये, तर 1 लाख 92 हजार रुपये किंमतीचे तब्बल 11 मोबाईल, चार मोटार सायकली, जुगाराचे साहित्य असा एकूण 3 लाख 58 हजार 240 रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला. यावेळी जुगार खेळणाऱ्या सर्व व्यक्तींसह जुगार अड्डाचालक राहुल रणपिसे व चित्रसेन मुके (सर्व रा. गोंदवले बु) यांच्याविरोधात दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुगार अड्ड्यावर अनिकेत यादव (वय- 33 वर्षे), शिवाजी सोनवणे (वय- 57 वर्षे), विशाल रणपिसे (वय-35 वर्षे), हेमंत पवार (वय- 35वर्षे), दादा कट्टे (वय- 53 वर्षे), मधुकर सोनवणे (वय- 60 वर्षे), रामचंद्र अवघडे (वय- 44वर्षे), दत्तात्रय रणपिसे (वय- 42 वर्षे), अमोल माने (वय- 30 वर्षे), संदीप पाटील (वय- 42 वर्षे), शिवाजी रणपिसे (वय- 63 वर्षे, सर्व रा. गोंदवले बु।) हे सर्वजण जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक जी. एम. दोलताडे करत आहेत. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अक्षय सोनवणे यांनी पोलीस हवालदार डी. के. भिसे, पोलीस नाईक एस. टी. अभंग, आर. पी. खाडे, पी. बी. कदम, वाय. आर. मोरे, पोलीस कॉन्स्टेबल जी. बी. खाडे यांच्या मदतीने केली.