कोल्हापुरमध्ये 23 वर्षीय पैलवानाचा हार्ट अटॅकने मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – आजकाल तरूणांमध्ये हृदयविकाराचे (heart attack) खूप प्रमाण वाढले आहे. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशीच एक घटना कोल्हापुरमध्ये घडली आहे. यामध्ये कुस्तीचा सराव करताना एका पहिलवानाला आपला जीव (heart attack) गमवावा लागला आहे. मारूती सुरवसे असे या मृत पैलवानाचे नाव आहे. तो 23 वर्षाचा होता. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मारूती सुरवसे हा पंढरपूर जवळील वाखरी येथील रहिवासी होता. गेल्या अनेक वर्षापासून तो कोल्हापुरातील तालमीत कुस्तीचा सराव करत होता. घटनेच्या दिवशी सायंकाळी सरावानंतर तो रूमवर आला. त्यानंतर आंघोळ केल्यानंतर अचानक त्याच्या छातीत दुखू लागल्याने त्यांच्या मित्राने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू (heart attack) झाला.

मारूती सुरवसे याचे वडील वडील शेतकरी आहेत. मारूतीच्या मृत्यूने पंढरपूर तालुक्यात आणि कोल्हापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कोरोनानंतर तरूणांमध्ये हृदयविकाराच्या प्रमाणात (heart attack) वाढ झाली आहे. त्यामुळे सगळीकडे चिंता व्यक्त केली जात आहे.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय