बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवालाचा भाजपमध्ये प्रवेश?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन : बॅडमिंटन खेळत भारताला अनेक मोठे विजय मिळवून देणारी सायना नेहवाल आज आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात करू शकते. सायना नेहवाल आज बुधवारी 29 जानेवारी रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांना आज भाजपा कार्यालयात घेण्याची तयारी सुरू झाली आहे. असे मानले जाते की सायना राष्ट्रीय अध्यक्ष … Read more

यंदाच्या आयपीएलमध्ये ‘या’ नवीन नियमाने सामन्यांचे निकाल बदलणार?

इंडियन प्रिमियर लीग २०२० स्पर्धा २९ मार्चपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना २४ मे रोजी मुंबईत होणार आहे. आयपीएलच्या १३व्या हंगामात बीसीसीआयने एक मोठा बदल केला आहे. काल आयपीएलच्या गर्व्हनिंग कौन्सिलची बैठक झाली. या बैठकीत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

अबब! दांडपट्ट्याने कापले तब्बल ४००० लिंबू; कोल्हापूरच्या गफूरने केला विक्रम

प्रजासत्ताक दिनाच औचित्य साधत शांतीदूत मर्दानी आखाड्याचा खेळाडू गफूर मुजावर याने दांडपट्ट्याने सपासप वार करत ४००० लिंबू कापण्याचा विक्रम नोंदवला. यासाठी त्याला एक तास ५८ मिनीटांचा कालावधी लागला. सकाळी साडेनऊ वाजता पद्मावती मंदिराच्या पिछाडीस एनसीसी रेसकोर्स रस्त्यावर याचे आयोजन केले होते.

तू ठीक आहेस ना? हे तुझं विचारणच मला आयुष्यात पुढं घेऊन गेलं..

दोन ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवलेली जपानची प्रसिद्ध टेनिस खेळाडू नाओमी ओसाका हिने बास्केटबॉलपटू कोबे ब्रायंटच्या अपघाती मृत्यूनंतर हळहळ व्यक्त करत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. या पत्रामध्ये तिने कोबेचं आपल्या जीवनात काय स्थान होतं हे वर्णन केलं आहे. संपूर्ण जगभरातून कोबे आणि त्याच्या मुलीच्या अपघाती मृत्युवरून हळहळ व्यक्त केली जात असताना ओसाकाने मला हे स्वीकारणं कठीण जात असल्याचं म्हणत ट्विटरवरून हे पत्र पोस्ट केलं आहे.

विराट कोहलीचा जिममधील ‘स्टंट व्हिडिओ’ सोशल मीडियावर व्हायरल!

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली त्याच्या फिटनेसमुळं जगभर ओळखला जातो. फेटनेसबाबत विराट नेहमीच आग्रही असतो. भारतीय संघातीलच नव्हे तर क्रिकेट विश्वात त्याच्या इतका फिट खेळाडू कोणी नाही असं आजकाल म्हटलं जात. मात्र, फिटनेस मेनटेंड करतांना विराट कमालीची मेहनत घेतो. याचीच एक झलक देणार एक व्हिडीओ इस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत विराट एक स्टंट करत असल्याचे दिसत आहे.

प्रसिद्ध बास्केटबॉलपटू कोबे ब्रायंटचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; कोबेच्या मुलीसह ९ प्रवाशी ठार

अमेरिकेतील लॉस एंजलिस भागात झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात कोबे ब्रायंट, त्याची १३ वर्षांची मुलगी आणि इतर ९ प्रवाशांचा मृत्यू झाला. कोबेच्या या अपघाती निधनामुळे क्रीडा जगतावर शोककळा पसरली आहे.

राहुल-श्रेयसच्या झुंजार खेळीने भारताचा दमदार विजय

श्रेयस अय्यरनेही शानदार फटकेबाजी करत राहुलला दमदार साथ दिली. दोघांच्या या बहारदार खेळीच्या जोरावर भारताने दुसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात न्यूझीलंडवर ७ गडी राखून विजय मिळवला.

कसोटी क्रिकेटमध्ये 5 लाख धावांचा टप्पा पार करणारी टीम बनली इंग्लंड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : इंग्लंड क्रिकेट संघ कसोटीत 500,000 धावा करणारा जगातील पहिला संघ बनला आहे. जोहान्सबर्गच्या वँडरर्स स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात इंग्लंडने हे कामगिरी केली. इंग्लंडने त्यांच्या 1022 व्या कसोटी सामन्यात हा विक्रम केला आहे. त्याचबरोबर 830 कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया 432,706 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे आणि भारत 540 कसोटी सामन्यात … Read more

मोहम्मद अझरुद्दीनवर २० लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल

मोहम्मद अझरूद्दीन याच्यासह तीन जणांवर ट्रॅव्हल्स कंपनीची २० लाख ९६ हजार ३११ रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद शहाब मोहम्मद असे तक्रारदाराचे नाव असल्याची माहिती सिटीचौक पोलिस ठाण्यातून मिळाली आहे.

न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; जखमी शिखर धवनच्या जागी ‘या’ खेळाडूला संधी

टीम हॅलो महाराष्ट्र : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) न्यूझीलंड दौर्‍यासाठी एकदिवसीय संघ जाहीर केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसर्‍या वनडे सामन्यात दुखापतग्रस्त स्टार फलंदाज शिखर धवनच्या जागी विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसनचा टी -२० संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर पृथ्वी शॉला एकदिवसीय संघात स्थान मिळालं आहे. सध्या मंडळाने कसोटी संघाची घोषणा केलेली नाही. NEWS: India’s ODI squad against New … Read more