गणरायाने वायू वेगाने काम करण्याची ताकद युती सरकारला द्यावी : शंभूराज देसाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

आता गणरायाच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे. शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब हे वायू वेगाने पळणारे नेते आहेत. त्यामुळे आता गेल्या दोन वर्षात विकासाचा बॅकलाॅग राहिला आहे, जे प्रकल्प रखडले गेले. ती कामे वायू वेगाने करण्याची ताकद गणरायाने युती सरकारला द्यावी, अशी प्रार्थना गणराया चरणी केली असल्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंंभूराज देसाई यांनी सांगितले.

राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा शहरातील पोवई नाका येथील कोयना दाैलत या आपल्या निवासस्थानी गणपती बाप्पाचे आगमन मोठ्या थाटात केले. यावेळी मरळी या त्याच्या गावचे मानकरी गणपती आणण्यासाठी पालखी घेवून आले होते. सनई चौघाड्यांच्या निनादात पालखीतून गणेशाची वाजतगाजत मिरवणूक निवासस्थानापर्यंत काढण्यात आली. यावेळी शंभूराज देसाई यांच्या आई, पत्नी, वहिनी, मुलगी, बंधू रविराज देसाई आणि मुलगा लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई उपस्थित होते.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/862119201438518

मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, गेले दोन वर्ष राज्य कोविडच्या संकटात होते, ते दूर झालेले आहे. राज्य अर्थिक संकटात होते. या बदलत्या परिस्थितीमध्ये अधिक गतिमान राज्य पुढे नेण्यासाठी वेगवान शिवसेना- भाजपा युती सरकारचे नेतृत्व महाराष्ट्राला मिळालेले आहे.