हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Redmi Note 11 SE : आज गणेश चतुर्दशीचा दिवस आहे. आजपासून गणेशोत्वास सुरुवात झाली आहे. यादरम्यान अनेक कंपन्यांकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक ऑफर्स दिल्या जातात. या दरम्यान अनेक वस्तूंची लाँचिंग देखील केली जाते. अशातच आजपासून Redmi च्या Note 11 SE या नवीन स्मार्टफोनची विक्री देखील सुरु झाली आहे. या दरम्यान, आता डिस्काउंट आणि इतर ऑफर्स द्वारे या स्मार्टफोनची किंमत 1500 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. हे लक्षात घ्या कि, गेल्याच आठवड्यात हा मोबाईल लॉन्च करण्यात आला आहे. यामध्ये चांगली बॅटरी, ऍडव्हान्स कॅमेरा सेटअप आणि पुढच्या बाजूला एक छोटा पंच होल कटआउट देण्यात आला आहे. यासोबतच यामध्ये 6 GB ची रॅम देखील मिळेल.
ज्यावेळी हा स्मार्टफोन (Redmi Note 11 SE) लाँच झाला त्यावेळी त्याची किंमत 13999 रुपये होती. मात्र आता तो 12499 रुपयांना लिस्ट करण्यात आला आहे. हे लक्षात घ्या कि, ICICI बँक कार्डद्वारे यावर 1000 रुपयांची सूट दिली जात आहे, तर एक्सचेंज ऑफर अंतर्गत यावर 500 रुपयांची सूट दिली जाईल. अशा प्रकारे तो 13,999 रुपयांऐवजी 12499 रुपयांना खरेदी करता येईल.
Redmi Note 11 SE मध्ये MediaTek Helio G95 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे.
Redmi Note 11 SE मध्ये 5000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
Redmi Note 11 SE मध्ये 6.43 इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे.
Redmi Note 11 SE मध्ये 64 GB अंतर्गत स्टोरेज उपलब्ध असेल.
Redmi Note 11 SE मध्ये 512 GB पर्यंतचे SD कार्ड इंस्टॉल केले जाऊ शकेल.
Redmi Note 11 SE मध्ये 6 GB रॅम देण्यात आली आहे.
Redmi Note 11 SE चा फोन 4 कलर व्हेरियंटमध्ये येईल.
Redmi Note 11 SE मध्ये 33 वॅटचा फास्ट चार्जर मिळेल.
Redmi Note 11 SE मध्ये सेल्फी आणि व्हिडिओसाठी 13-मेगापिक्सेल कॅमेरा आहे.
Redmi Note 11 SE च्या बॅक पॅनलवर क्वाड कॅमेरा सेटअप असेल, ज्यामध्ये 64-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा असेल.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.mi.com/in/product/redmi-note-11-se/
हे पण वाचा :
BSNL कडून 49 रुपयांच्या प्लॅनमध्ये व्हॉईस कॉलिंगसहीत मिळेल इंटरनेट डेटा !!!
Karnataka Bank ने सुरु केली नवीन कालावधीची FD, बघा किती मिळतंय व्याज !!!
Investment Tips : मजबूत नफा मिळवण्यासाठी श्री गणेशाकडून समजून घ्या गुंतवणुकीच्या ‘या’ 7 टिप्स !!!
आता तिकीट कॅन्सलेशन चार्जवर देखील आकारला जाणार GST, रेल्वे विभागाने म्हटले कि…
PM Kisan चा 12 वा हप्ता हवा असेल तर उद्यापर्यंत करावी लागेल eKYC, जाणून घ्या संपूर्ण पद्धत