सांगली । अखंड हिंदुस्थानला तीन बाधा झाल्या त्या म्हणजे म्लेच्छांची, अंधश्रध्देची आणि गांधी बाधा यामुळे हिंदुस्थान धोक्यात आला आहे. या सर्वांना परतावून लावायचे असेल तर शिवाजी, संभाजी मंत्र जोपासला पाहिजे. अखंड हिंदुस्थानचे स्वप्न साकार करायचे असेल तर हे दोन मंत्रच जपले पाहिजे. यांचे विचार जगाला प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडेगुरूजी यांनी केले.
मिरजेतील शिवतीर्थावर असलेल्या अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसर सुशोभिकरण लोकार्पण सोहळाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. संभाजीराव भिडे गुरूजी म्हणाले,” छत्रपतींचे विचार आजही जगाला प्रेरणादायी आहेत. सप्तसिंधु मुक्त झाल्या पाहिजे. सप्तसिंधुंच्या काठावर झालेले धार्मिक अतिक्रमण उध्दवस्त केले पाहिजे.” त्यासाठी देशाभिमान,राष्ट्राभिमान आणि धर्माभिमान बाळगला पाहिजे असेही भिडे म्हणाले आहेत.
तरूणांनी छत्रपतींचे विचार जोपासले पाहिजेत. अखिड हिंदुस्थान निर्माण करण्याची धमक बाळगली पाहिजे. हिंदुस्थानला झालेली बाधा दूर करावेच लागेल असेही शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरूजी यांनी सांगितले. शिवतीर्थावरील परिसर ३७ लाख रूपये खर्चुन सुशोभिकरणाचे काम करण्यात आले आहे. त्याचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. शिवतीर्थावर शिवभक्तांची प्रचंड गर्दी झाली होती. शिवतीर्थावरील जुन्या चबुतर्याचे बांधकाम, बांधीव दगडी कमान, तसेच भाले व मशाल चारही बाजुने बसविण्यात आले आहे. पुतळ्याच्या चबुतर्यावरच्या बाजूस पावनखिंड, राज्याभिषेक, छत्रपती संभाजी महाराज तसेच शिवकालीन प्रसंग साकारलेले आहे.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/856067835786890