हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वाना हवाहवासा वाटणारा आणि ज्या सणाची मोठ्या आतुरतेने ज्याची वाट बघितली जाते तो गणेश चतुर्थी हा सण दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरा केला जातो. या काळात प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पाची मूर्ती आणून त्याची मनोभावे पूजा केली जाते. खजी ठिकाणी ११ दिवसांचा गणपती असतो तर काही जणांच्या घरी दीड तर काही भक्त ५ दिवसांचा गणपती घरी आणतात. यंदा ७ सप्टेंबरला सुरु होणार असून १७ संप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे. पण इतर कोणत्या सणापेक्षाही गणेशोत्सव इतक्या मोठ्या धूमधडाक्यात का साजरा केला जातो? यामागे नेमकं कारण आणि इतिहास काय आहे हे तुम्हाला माहितेय का?चला तर मग जाणून घेऊयात….
देशभरात गणेश चतुर्थीचा सण मोठ्या थाटामाटात आणि आनंदाने साजरा केला जातो आणि त्यामागे एक प्रमुख कारण लपलेलं आहे. पौराणिक कथेनुसार, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला भगवान श्रीगणेशाचा जन्म झाला म्हणून हा दिवस गणेश चतुर्थी म्हणून साजरा केला जातो. श्रीगणेशाच्या जयंतीच्या दिवशी लोक त्याला ढोलताशांच्या गजरात घरी आणतात आणि विधीपूर्वक त्याची पूजा करतात. तसेच ११ दिवस गणपती बाप्पाला गोड़धोड पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवले जातात. गणपतीला दुर्वा वाहतात, मोदक लाडू देतात. दररोज न चुकता सकाळ संध्याकाळ गणरायाची आरती केली जाते.
गणेश विसर्जनाची रोचक कहाणी
गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची स्थापना केली जाते आणि त्यानंतर ११ व्या दिवशी त्याचे विसर्जन केले जाते. मात्र गणपतीचे विदर्ज का केलं जाते हे पण जाणून घेणं आवश्यक आहे. पौराणिक कथेनुसार, महर्षी वेदव्यासजींनी भगवान गणेशाला महाभारताची रचना लिहिण्याची विनंती केली होती. त्यानंतर गणेश चतुर्थीच्या दिवशीच व्यासजींनी श्लोकाचे पठण सुरू केले आणि गणेशजींनी ते लिहिण्यास सुरुवात केली. त्यांनी न थांबता 10 दिवस सतत लिहिलं आणि 10 दिवसात गणेशजींना धूळ आणि घाणीचा थर चढला. हा थर स्वच्छ करण्यासाठी गणेशजींनी 10 व्या दिवशी सरस्वती नदीत स्नान केले आणि ही चतुर्थी होती. तेव्हापासून गणेश चतुर्थीचा सण साजरा केला जातो आणि गणपतीचे विधीपूर्वक विसर्जन केले जाते.
टीप – वर दिलेली सर्व माहिती सामाजिक आणि धार्मिक श्रद्धांवर आधारित आहे.हॅलो महाराष्ट्र त्याची पुष्टी करत नाही. यासाठी तज्ञांचा सल्ला घ्या.