Ganesh Chaturthi 2024 : गणेशोत्सवाचा घ्या ‘बेस्ट’ आनंद ! रात्री उशिरापर्यंत पहा देखावे, बेस्ट आणि मेट्रोने केली खास सोय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Ganesh Chaturthi 2024 : गणेशोत्सवाचा घ्या ‘बेस्ट’ आनंद ! रात्री उशिरापर्यंत पहा देखावे, बेस्ट आणि मेट्रोने केली खास सोयअवघ्या महाराष्ट्राला आता वेध लागले आहेत गणेशोत्सवाचे. पुढच्या 24 तासात गेणेश उत्सवाला सुरुवात होणार असून त्याकरिता तयारीची धावपळ सुरु आहे. मुंबईत मोठ्या धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला जातो. मंडळांचे देखावे पाहण्यासाठी मोठी गर्दी मुंबईच्या रस्त्यांवर होत असते. म्हणूनच प्रवाशांची गैरसोय होऊन नये याकरिता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत करण्याकडे (Ganesh Chaturthi 2024) भर दिला जातो आहे.

अनेक जण मंडळांचे देखावे पाहण्यासाठी बाहेर पडत असतात मात्र अशावेळी रात्री उशीर झाल्यास गणेश भक्तांना खाजगी वाहनांनी जावे लागते. म्हणूनच हीच बाब लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या काळामध्ये बेस्ट आणि मेट्रोच्या सेवा वाढवण्यात येणार आहेत. दिवसा बेस्टच्या सेवा नियमित असतात त्यामुळे (Ganesh Chaturthi 2024) वाहतुकीस अडचण येत नाही मात्र रात्रीच्या वेळेस गणेश भक्तांना कोणतीही अडचणी येऊ नये याकरिता अतिरिक्त बसेस चालवण्याचा निर्णय बेस्ट न घेतला आहे.

गणेश आगमन हे सात तारखेला होणार असून 7 ते 16 सप्टेंबर या कालावधीमध्ये रात्रीच्या वेळी अतिरिक्त बसेस चालवण्याचा निर्णय बेस्ट कडून घेण्यात आला आहे. त्याचबरोबर गणेशोत्सवा दरम्यान मेट्रोच्या सेवेत मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये देखील वाढ करण्यात येणार (Ganesh Chaturthi 2024) असून 11 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये अंधेरी पश्चिम आणि गुंदवली या दोन्ही टर्मिनस वरून शेवटची मेट्रो ट्रेन रात्री 11 ऐवजी रात्री 11:30 वाजता सोडणार आहेत

कसा असेल बेस्टचा मार्ग

कुलाबा परिसरातून उत्तर-पश्चिम मुंबईकडे गिरगाव, लालबाग, परळ, चेंबूरमार्गे बस चालविण्यात येणार आहेत. बसमार्ग क्रमांक 4 मर्या. जे.जे रुग्णालय ते ओशिवरा आगार, 8 मर्या. जिजामाता उद्यान ते शिवाजी नगर, ए – 21 डॉ. एस.पी.एम. चौक ते देवनार आगार, ए -25 बॅकबे आगार ते कुर्ला आगार, ए-42 कमला नेहरू पार्क ते सॅण्डहर्स्ट रोड स्थानक, 44 वरळी व्हिलेज ते एस. यशवंते (Ganesh Chaturthi 2024) चौक (काळाचौकी), 66 इलेक्ट्रीक हाऊस ते सांताक्रूझ आगार, 69 डॉ. एस.पी.एम. चौक ते पी.टी. उद्यान, शिवडी, व सी -51 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते काळाकिल्ला आगार या बसमार्गावर रात्रीच्या जादा बस फेऱ्या धावतील, अशी माहिती बेस्टकडून देण्यात आली आहे .

कसे असेल मेट्रोचे वेळापत्रक (Ganesh Chaturthi 2024)

दहिसर अंधेरी पश्चिम मेट्रो दोन अ आणि दहिसर ते गोंदवली मेट्रो सात मार्गांवरील फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. या दोन्ही मार्गिकांवर वीस फेऱ्या वाढवण्यात आलया आहेत तर सेवेच्या कालावधीत 30 मिनिटांची वाढ करण्यात आली आहे. तर रात्री अकरा वाजता बंद होणारी मेट्रो सेवा अकरा ते 17 सप्टेंबर दरम्यान रात्री साडेअकरा वाजता बंद होणार आहे.

मेट्रोचे वेळापत्रक

  • गुंदवली ते अंधेरी (पश्चिम): रात्री 19:20, 10:39, 10:50 आणि 11 वाजता (4 सेवा)
  • अंधेरी (पश्चिम) ते गुंदवली : रात्री 10:20, 10:40, 10:50 आणि 11 वाजता ( 4सेवा)
  • गुंदवली ते दहिसर (पूर्व): रात्री 11:15 आणि 11:30 वाजता (2सेवा)
  • अंधेरी पश्चिम ते दहिसर (पूर्व): रात्री 11:15 आणि 11:30 वाजता (2सेवा)
  • दहिसर (पूर्व) ते अंधेरी पश्चिम : रात्री 10:53, 11:12, 11:22 आणि 11:33 वाजता (4सेवा)
  • दहिसर (पूर्व) ते गुंदवली : रात्री 10:57, 11:17, 11:27 आणि 11:36 वाजता (4सेवा)