Ganeshotsav Celebration | गणेशोत्सवासाठी रायगड मार्गे कोकणात जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; प्रशासनाने केली खास सोय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Ganeshotsav Celebration | गणेश चतुर्थी अगदी काही दिवसांवर आलेली आहे. दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जात आणि शहरात शिकण्यासाठी किंवा नोकरीसाठी आलेले अनेक लोक हे गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या गावी जात असतात. त्यामुळे गावी जाणाऱ्या लोकांची संख्या देखील वाढ झालेली असते. खास करून कोकणात जाणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त असते. कारण कोकणामध्ये गणेशोत्सव (Ganeshotsav Celebration) मोठ्या उत्साहाने साजरा करतात. अनेक लोक हे गणपतीसाठी एसटी बस किंवा खाजगी रस्त्याने जात असतात. अनेक लोक शक्य तितक्या पर्यायी मार्गाचा वापर करून लवकरात लवकर गाव गाठण्याचा प्रयत्न करत असतात. आता या लोकांना देखील लवकरात लवकर त्यांच्या घरी जाता यावे आणि प्रवासात त्यांना काही अडचणीचा सामना करावा लागू नये यासाठी प्रशासन देखील मदत करणार आहे.

कोकणात जाणाऱ्या नागरिकांना लवकरात लवकर घरी जाता यावे. यासाठी रायगड प्रशासनाने विशेष काळजी घेतलेली आहे. प्रशासनाने रायगड जिल्ह्यात मुंबई गोवा या महामार्गावर तब्बल दहा ठिकाणी सुविधा केंद्र उभारली आहेत. म्हणजे प्रवास करताना लोकांना कोणत्याही प्रकारची अडचण आली तर ते मदत केंद्राच्या माध्यमातून मदत मदतीसाठी विचारणा करू शकतात. या प्रवासा दरम्यान तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण झाला, तरी ही मदत केंद्र तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरतील.

मदत केंद्रावर कोणत्या सुविधा मिळणार | Ganeshotsav Celebration

रस्ते मार्गाने गणेशोत्सवात खूप जास्त गर्दी असते. यावेळी जर अचानक वाहनांना काही झाले. किंवा वैद्यकीय सुविधा आपल्याला पाहिजे असेल, तर या आता प्रशासनाने यासाठी मदत केंद्र दिलेली आहेत. या मदत केंद्रावर टोइंग व्हॅन, वाहन दुरुस्ती, वैद्यकीय सुविधा, बाल आहार कक्ष, महिलांसाठी फीडिंग कक्ष यांसारख्या वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचप्रमाणे आता प्रवाशांना चहा, बिस्कीट, सरबत, पाणी, ओआरएस यांसारख्या गोष्टी देखील मोफत पुरवल्या जाणार आहेत. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी या सगळ्याची व्यवस्था केलेली आहे. आणि 4 सप्टेंबर 2024 पासून ही केंद्र सुरू करण्याचा सूचना दिलेल्या आहेत.

मदत केंद्र कुठे असतील | Ganeshotsav Celebration

मुंबई गोवा महामार्गावर रायगड टप्प्यात येणारा खारपाडा, खारपाले, वाकण, कोलाड, इंदापूर, माणगाव, लोणेरे, महाड शहर त्यानंतर पुढे टोलनाका पोलादपूर या ठिकाणी ही मदत केंद्र उभारण्यात आलेली आहेत.या केंद्रांच्या सुविधाचा आता नागरिकांना जास्तीत जास्त लाभ होणार आहे

यावर्षी 7 सप्टेंबर 2024 रोजी गणेश चतुर्थी आहे. त्यामुळे आधी दोन दिवसच लोक गावचा प्रवास सुरू करतात. मुंबईवरून देखील मोठ्या संख्येने लोक खाजगी तसेच सरकारी वाहनांमधून गावी जात असतात. त्यामुळे गोवा महामार्गावर खूप जास्त प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. अनेक बाजारपेठांच्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे आता नागरिकांनी शक्य तितका मोकळा रस्ता भेटेल त्या ठिकाणावरून जावे