Ganeshotsav Celebration | यंदा बाप्पासाठी घरीच बनवा हे खास नैवैद्य; जाणून घ्या सविस्तर रेसिपी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Ganeshotsav Celebration | आपल्या भारताला खूप मोठी परंपरा लाभलेली आहे. त्यामुळे आपल्या देशातील प्रत्येक संस्कृती साजरी केली जाते. सध्या संपूर्ण देशभरात गणेश उत्सवाची तयारी चालू झालेली आहे. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. पुराणानुसार या दिवशी गणपतीचा जन्म झाला होता. त्यामुळे हा दिवस गणेश चतुर्थी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सगळेजण आपल्या घरात गणपतीची छोटीशी मूर्ती स्थापन करतात. जितके दिवस गणपती घरात असतो. तितके दिवस त्याची मनोभावे प्रार्थना करतात, आराधना करतात. आणि सेवा देखील करतात. यावर्षीच्या पंचांगानुसार गणेश चतुर्थीची 7 सप्टेंबर 2024 रोजी येत आहे. हिंदू धर्मामध्ये गणपतीला हे आद्यस्थान दिले जाते. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करायची असल्यास आपल्याकडे गणपतीची पूजा केली जाते. म्हणजेच कोणतेही शुभ काम करण्याआधी लोक गणपतीला आमंत्रण देतात.

काही लोकांच्या घरात गणपती दीड दिवसाचा असतो. काहींच्या घरी पाच दिवसांचा असतो, तर काहींच्या घरी अकरा दिवसांचा असतो. या दिवसात सगळेजण बाप्पाची जमेल तसे सेवा करत असतात. बाप्पाला आवडणारे सगळे पदार्थ नैवेद्य बाप्पासाठी तयार करत असतात. बाप्पासाठी वेगवेगळे पदार्थ अर्पण करत असतात. गणपती बाप्पाचा सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे मोदक. त्याच प्रमाणे बापाला मोतीचूर लाडू देखील खूप आवडतात. आता तुम्ही या गणपतीच्या दिवसांमध्ये बाप्पाला मोतीचूर लाडू आणि मोदकाचा प्रसाद म्हणून देऊ शकता. आता ते कसे बनवायचे हे आपण सोप्या पद्धतीने जाणून घेऊया.

मोतीचूर लाडू बनवण्यासाठी साहित्य | Ganeshotsav Celebration

बेसन, साखर, दूध, तूप, हिरवी वेलची, फूड कलर, बेकिंग सोडा, पाणी.

मोतीचूर लाडू बनवण्याची पद्धत

मोतीचूर लाडू बनवण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी साखरेचा पाक तयार करावा लागेलं. यासाठी तुम्ही मध्यम आचेवर एका मोठ्याकडे पाणी गरम करा. त्यात साखर घाला आणि साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत ते पाणी ढवळत रहा. त्यानंतर तुम्ही त्या पाण्यात दूध घालून पाच मिनिटे मंद आचेवर ते पाणी चांगले उकळू द्या. उकळताना त्या पाण्यावर फेस तयार होऊ लागेल. त्यानंतर तुम्ही चमच्याच्या साह्याने पाक घट्ट होईपर्यंत शिजवा त्यानंतर त्या पाकात वेलची पूड आणि केशरी रंग घालून हळूहळू ढवळत रहा.

त्यानंतर तुम्ही एका भांड्यात बेसन आणि दूध मऊ होईपर्यंत मिक्स करा. आणि त्यामध्ये बेकिंग सोडा घालून ते चांगले मिक्स करून घ्या. त्यानंतर एका कढईमध्ये तूप गरम करा कढईच्या अगदी वर झारा ठेवा. आणि लाडूसाठी तयार केलेले बॅटर तेलात घाला. बुंदी तेलात टाकल्यानंतर ती सोनेरी रंगावर होईपर्यंत तळून घ्या.आता ही बुंदी ठीशू पेपरवर काढा. जेणेकरून त्यात असलेले जास्त तेल निघून जाईल. आता ही बुंदी साखरेच्या पाकात घालून नीट मिक्स करा .आणि थंड होईपर्यंत तसेच राहू द्या. थंड झाल्यावर या बुंदीपासून लहान लहान आकाराचे लाडू तयार करा.

मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य

तांदळाचे पीठ, पाणी, तूप, गूळ, खोबरे, ड्रायफ्रूट्स

मोदक बनवण्याची पद्धत |Ganeshotsav Celebration

मोदक बनवण्यासाठी तुम्ही सगळ्यात आधी खोबरं आणि गूळ चांगला किसून घ्या. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून त्यात खोबरं आणि गूळ चांगला मिक्स होईपर्यंत परतून घ्या. त्यात तुम्ही बारीक चिरून ड्रायफ्रूट्स देखील घालू शकता. हे मिश्रण एका ताटलीमध्ये बाजूला काढून ठेवा. त्यानंतर तुम्ही एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवा. ते पाणी उकळल्यानंतर त्यात तांदळाचे पीठ टाका आणि ते चांगले मिक्स करून घ्या. हे पीठ पूर्ण मिक्स झाल्यानंतर ते बाजूला काढून हलक्या हलक्या हाताने ते मिक्स करून मऊसूद मळून घ्या. त्यानंतर तुम्ही त्या तांदळाच्या पिठापासून छोटे छोटे मोदक तयार करा. आणि त्यानंतर ते मोदक एकदा उकडून घ्या. अशा प्रकारे तुम्ही बापाला मोदकाचा नैवेद्य करू शकता.