Ganeshotsav Celebration | देशातील सर्वात मोठा गणेशोत्सव हा सण लवकरच येत आहे. या वर्षी 7 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी येत आहे गणेशोत्सव संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने आणि जल्लोसा साजरा करतात. परंतु याच काळात मोबाईल चोरांचा सुळसुळाट देखील खूप मोठ्या प्रमाणात सुटलेला असतो. पुण्या मुंबईसारख्या मोठ्या शहरात गणेश उत्सवानिमित्त खूप जास्त गर्दी असते. आणि याचवेळी चोरटे संधी साधून लोकांचे मोबाईल तसेच इतर सगळ्या गोष्टी चोरण्याचा प्रयत्न करतात. तसेच या गर्दीत मुलींची छेडछाड देखील केली जाते. परंतु अशा चोरांवर आणि छेड काढणाऱ्यांवर यावर्षी पुणे पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे.
सगळ्या नागरिकांना सुरक्षित वाटावे आणि त्यांना देखील या गणेशोत्सवाचा आनंद घेता यावा. यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. सध्या आपण पाहिले तर संपूर्ण भारतात महिला बाबतची गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. अगदी लहान मुलींपासून ते म्हाताऱ्या बायका देखील भारतात सुरक्षित नसल्याच्या गोष्टी समोर येत आहेत. आणि आता याच गोष्टींना आळा घालण्यासाठी गणेशोत्सवात अशा कोणतीही अनुचित घटना घडून कार्यक्रमाला गालबोट लागू नये यासाठी आता पुणे पोलिसांकडून एक मोठे पाऊल उचलण्यात येणार आहे.
आता गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav Celebration ) पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून 24 तास मदत केंद्र उभारण्यात येणार आहे. पुणे विभागात मध्यभागात 18 पोलीस केंद्र उभारण्यात येणार आहे. यात गणेश उत्सव दरम्यान मोबाईल चोरी महिलांचे दागिने चोरणाऱ्या चोरट्यांची माहिती घेण्यात येणार आहेत. तसेच विशेष शाखा , गुन्हे शाखा वाहतूक शाखेतील कर्मचारी तैनात करण्यात येणार आहे गणेश विसर्जनासाठी आणि आगमनाचा मोठमोठ्या मिरवणुका निघतात.
त्यामुळे अनेक रस्ते ब्लॉक होत असतात. परंतु या वर्षी या मिरवणुकीत देखील मोठ्या प्रमाणात पोलिसांची कडक बंदोबस्त असणार आहे. तसेच जे लोक चोरी करतात तसेच महिलांची छेड काढतात. अशा सगळ्या लोकांवर यावर्षी कडक कारवाई पुणे पोलिसांकडून होणार आहे. यासाठी मदत केंद्र देखील उभारण्यात आलेली आहे. जर कुठल्याही व्यक्तीला काही संशयास्पद वाटले. तर ते थेट जाऊन पोलिसांशी संपर्क साधू शकता.ज्यामुळे पोलिसांना त्या व्यक्तीला पकडण्यास आणि शिक्षा देण्यास देखील सोपे होईल .