गॅंगस्टरला मुंबईहून घेऊन जात असताना UP पोलिसांची गाडी पलटी; गॅंगस्टर जागीच ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गुना । उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या बहुचर्चित गँगस्टर विकास दुबे एन्काऊंटरच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत. एका वाँटेड गँगस्टरला मुंबईतून अटक करुन उत्तर प्रदेशला नेत असताना वाटेत मध्य प्रदेशमध्ये युपी पोलिसांची कार अचानक पलटी झाली. या अपघातात सदर गँगस्टर जागीच ठार झाला तर काही पोलीसही जखमी झाले.अपघातात ठार झालेल्या गॅंगस्टरचे नाव फिरोज अली उर्फ शामी असे होते. कमालीची बाब म्हणजे, गँगस्टर विकास दुबे एन्काऊंटरच्या वेळी सुद्धा त्याला अटक करून घेऊन जात असताना वाटेतच उत्तर प्रदेश पोलिसांची कार पलटी झाली होती.

लखनऊ पोलिसांच्या टीमने शनिवारी फिरोज अलीला नालासोपारा येथील झोपडपट्टीतून अटक केली होती. पोलीस त्याला कारने उत्तर प्रदेशला नेत असताना, मध्य प्रदेशच्या गुना जिल्ह्यात पोलिसांची कार पलटी झाली. त्यामध्ये फिरोज अलीचा मृत्यू झाला. या अपघातात तीन पोलीसही जखमी झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग २६ वर अपघाताची ही घटना घडली. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

दरम्यान, या घटनेने गँगस्टर विकास दुबे एन्काऊंटरच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. पोलिस हत्याकांडातील मुख्य आरोपी असलेल्या विकास दुबेला उत्तर प्रदेश पोलीस मध्य प्रदेशातून अटक करुन, उत्तर प्रदेशला घेऊन येत असताना अशाच प्रकारे वाहन पलटी झाले होते. त्यानंतर तिथून पळण्याचा प्रयत्न करणारा विकास दुबे पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.