औरंगाबाद : छावणी परिषदेच्या अहमदनगर रोडवरील कचरा डेपोला मंगळवारी संध्याकाळी अचानक आग लागली. त्यात डेपोशेजारी लावण्यात आलेली काही झाडे जळाली. सुदैवाने कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही.
छावणी परिषदेचे कर्मचारी, अग्निशमन दल व जनसहयोग संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी ही आग आटोक्यात आणली. या आगीची माहिती मिळताच छावणी परिषदेचे कर्मचारी घटनास्थळी गेले व त्यांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. छावणीच्या पाण्याचे टँकरही पाठवण्यात आले. वाळलेल्या गवतामुळे ही आग पसरली.
प्रसंगावधान राखून छावणी परिषद, स्वच्छता अधिकारी मिलिंद ढाकणे, कर्मचारी हर्षल यादव, कचरा व्यवस्थापनचे महेश लखोटिया तसेच जनसहयोग संस्थेचे प्रशांत गिरे व त्यांचे सहकारी या सर्वांनी ही आग विझवण्यास मदत केली.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group