कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करायचे आहे? तर गुळासोबत खावा लसूण; मिळतील आश्चर्यचकीत फायदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढणे म्हणजे अनेक आजारांना निमंत्रण देण्यासमान असते. शरीरात वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळेच हृदयविकार आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो. तर बॅड कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये जमा झाल्यामुळे नसा ब्लॉक होतात. खरे तर, अती तेलकट मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढत जाते. मात्र घरगुती पदार्थांचा वापर करूनही या कोलेस्ट्रॉलला कमी करता येते. हे पदार्थ नेमके कोणते आहेत त्याचे फायदे काय? याविषयी वाचा. (Garlic And Jaggery Health Benefits)

आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये गूळ आणि लसूण नेहमी असतोच. हा गुळ आणि लसूण एकत्र खाल्ल्यामुळे बॅड कोलेस्ट्रोल कमी होते. आयुर्वेदानुसार, हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी लसूण आणि गुळ खाणे अत्यंत फायदेशीर ठरते. यासाठी तुम्ही गुळ आणि लसणाची चटणी बनवून खाऊ शकता. तसेच, गुळ आणि लसूण एकत्र स्टोअर करून ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा खाऊ शकता. भारतीय स्वयंपाकात प्रत्येक भाजीत लसूण वापरला जातो. फक्त या लसणाला गुळासोबत खायची गरज आहे.

याचे फायदे कोणते पण??

लसूण आणि गुळ खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. तसेच रक्ताची कमतरता दूर होते. लसूण हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी मदत करतो. या लसणात अॅलिसिन नावाचा गुणधर्म असतो. यासह, फॉस्फरस, झिंक, पोटॅशियम अशा इतर ही गोष्ट असतात. त्यामुळे लसूण खाणे शरीरासाठी फायदेशीर ठरतो. लसणातील अॅलिसिन हे बॅड कोलेस्ट्रॉलच्या ऑक्सिकरणाला रोखण्याचे काम करते. कच्चा लसूण खाल्ल्यामुळे पचनाच्या समस्या दूर होतात.

सेवन कसे करावे??

लसूण आणि गुळाचे सेवन रोज सकाळी रिकाम्या पोटी करावे. त्यासाठी सर्वात प्रथम लसणाच्या दोन-तीन पाकळ्या तुपात परताव्यात. त्यानंतर लसूण गुळासोबत रिकाम्या पोटी खावा. असे केल्यामुळे शरीरातील चांगले फायदे दिसून येते.