पंढरपूर प्रतिनिधी | गोर गरिबांचे, शेतकऱ्यांचे दैवत म्हणून ख्याती असणाऱ्या विठ्ठलाला त्याच्या भक्तांनीच श्रीमंत आणि करोडपती बनवल्याची घटना घडली आहे. ३ जुलै ते १७ जुलैदरम्यान दर्शन घेतलेल्या भाविकांच्या विविध देणग्याच्या रूपाने मंदिर समितीकडे ४ कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने पंढरीच्या पांडुरंगाला लोकांनी करोडपती बनवले आहे.
३ जुलै ते १७ जुलै या कालावधीत पंढरपुरात आषाढी वारी निमित्त आलेल्या भाविकांनी विठ्ठलाला भरभरून दान दिले आहे. यावर्षी विठ्ठल आणि रुक्मिणी देवस्थानला ४ कोटी ४० लाख ३७ हजार ७८६ रुपये एवढी रक्कम दान स्वरूपात मिळाली आहे. तसेच गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी हि रक्कम १ कोटी ५० हजारांच्या तुलनेत वाढली आहे.
विठ्ठल रुक्मिणीच्या पायावर अर्पण केलेल्या रकमेचा तपशील देखील मंदिर समितीने जाहीर केले आहेत. पंढरीत आलेल्या भाविकांनी विठ्ठलचरणी ३९ लाख ६३ हजार ४२४ रुपयांचे दान तर रुक्मिणीमातेच्या चरणी ७ लाख ७२ हजार १८० रुपयांचे दान अर्पण केले आहे. धार्मिक स्थळी धर्म वाढवण्यासाठी आणि धर्म कार्यासाठी काही रोख रक्कम आणि काही अन्य वस्तू दान करण्याची परंपरा मागील अनेक शकता पासून पाळली जाते आहे. ती आज देखील अखंडितपणे कायम ठेवली जाते आहे. याचंच प्रत्येय या आकडेवारीवरून आला आहे.