हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात लोकप्रिय आणि श्रीमंतांच्या यादीत आघाडीवर असलेले अदानी (Adani Group) समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी (Gautam Adani) यांनी त्यांच्या निवृत्तीबाबतचं नियोजन जाहीर केलं आहे. सध्या वय वर्ष ६२ असलेले अदानी वयाच्या ७० व्या वर्षी निवृत्ती जाहीर करणार आहेत. ब्लूमबर्गनं दिलेल्या वृत्तानुसार गौतम अदानींनी अदाणी समूहाची सूत्र कधी व कशी त्यांच्या वारसांकडे सोपवणार आहेत, यासंबंधी मोठं भाष्य केलं आहे. यानुसार, आगामी काळात अदानी यांचा पुढचा प्लॅन काय? जगभरात मोठं साम्राज्य असलेल्या अदानी समूहाची धुरा कोणाकडे असेल? याबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
2030 पर्यंत अदानी समूहाचे अध्यक्षपद सोडणार – Gautam Adani
ब्लूमबर्गच्या हवाल्यानुसार. गौतम अदानी (Gautam Adani) 2030 पर्यंत अदानी समूहाचे अध्यक्षपद सोडणार आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर कंपनीची जबाबदारी त्यांची दोन मुले आणि दोन पुतण्यांवर असणार आहे. अहवालात म्हटले आहे की जेव्हा अदानी निवृत्त होतील तेव्हा त्यांचे चार वारस – मुलगे करण अदानी आणि जीत अदानी आणि त्यांचे पुतणे प्रणव आणि सागर अदानी या चौघांमध्ये अदाणी समूहाचं हस्तांतरण केलं जाईल. पण ते नेमकं कसं होईल? याविषयी अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, गौतम अदानी यांनी आपली दोन मुलं आणि दोन पुतण्यांना विचारले कि त्यांना अदानी समूहाचं विभाजन करून वेगळं होणं योग्य वाटतंय की एकत्र राहणंच योग्य वाटतंय ? तसेच यावर निर्णय घेण्यासाठी तीन महिन्यांची मुदत सुद्धा देण्यात आली आहे. सध्या गौतम अदानी यांचा मोठा मुलगा करण अदानी अदानी पोर्टचे व्यवस्थापकीय संचालक आहे, तर छोटा मुलगा जीत अदानी अदानी पोर्टचे संचालक आणि सागर अदानी ग्रीन अदानीचे कार्यकारी संचालक आहेत.
दरम्यान, अदानी समूह हा देशातील सरावात मोठा समूह आहे. देशातील जवळपास सर्वच क्षेत्रात अदानी समूहाचा वरचष्मा आहे. बंदरांच्या नियोजन व व्यवस्थापनाचं क्षेत्र असो, इंधन निर्मिती असो, बांधकाम क्षेत्र असो किंवा ग्रीन एनर्जी असो.. प्रत्येक ठिकाणी अदानी समूहाचा महत्वाचा वाटा राहिला आहे. याशिवाय केंद्र सरकारचे अनेक प्रकल्प सुद्धा अदानी ग्रुपकडे आहेत.