गौतम अदानी उभारणार जगातील सर्वात मोठे ग्रीन एनर्जी पार्क; ट्विट करत दिली माहिती

gautam adani
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्याकडून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नवनवीन प्रकल्प उभारण्याची जोरदार तयारी सुरू आहे. आता गौतम अदानी यांनी गुजरातमध्ये बांधल्या जाणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या ग्रीन एनर्जी पार्कचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून ते 2 कोटींहून अधिक लोकांना रोजगार देणार आहेत. गुजरातमधील कच्छमध्ये उभारले जाणारे ग्रीन एनर्जी पार्क 726 चौरस किलोमीटर परिसरात व्यापलेले असणार आहे. यातूनच 30 GW विजेची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे देशाच्या विकासासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरेल.

ग्रीन एनर्जी पार्क प्रकल्पाविषयी माहिती देत गौतम अदानी यांनी म्हटले आहे की, आम्हाला जगातील सर्वात मोठे ग्रीन एनर्जी पार्क तयार करत असताना अक्षय ऊर्जेमध्ये भारताच्या प्रभावी प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याचा अभिमान वाटतो. 726 चौरस किमी परिसरात व्यापलेला हा प्रकल्प अवकाशातूनही दिसतो. या प्रकल्पातून आम्ही 20 दशलक्ष घरांना वीज देण्यासाठी 30GW निर्माण करणार आहोत.

तसेच “150 किमी अंतरावर मुंद्रा येथे आम्ही सौर आणि पवनासाठी जगातील सर्वात व्यापक आणि एकात्मिक अक्षय ऊर्जा निर्मिती इकोसिस्टम तयार करत आहोत. सौर अलायन्स आणि आत्मनिर्भर भारत उपक्रमासाठी आमची वचनबद्धता अधोरेखित करून. शाश्वत ऊर्जेच्या दिशेने भारताच्या प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.” अशी माहिती गौतम अदानी यांनी दिली आहे.

दरम्यान, सध्या अदानी समूहाच्या शेअर्समध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. यामुळे गौतम अदानी यांच्या संपत्तीत देखील कित्येक दुपटीने वाढ झाली आहे. कशातच गौतम अदानी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करताना आणि प्रकल्प उभारताना दिसत आहेत. आता नुकतेच त्यांनी ग्रीन एनर्जी पार्कचे फोटो शेअर केले आहेत. ज्यातून हा प्रकल्प जगातील सर्वात भव्य प्रकल्प असेल हे स्पष्ट दिसत आहे.