हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) …. भारतीय क्रिकेटचे २ अनमोल हिरे… दोघेही भारताचे आधारस्तंभ.. मागील १५ वर्षापासून दोघांनीही भारतीय क्रिकेटची चांगली सेवा केली आहे. मात्र यंदाच्या T20 विश्वचषक स्पर्धेनंतर दोघांनीही आंतरराष्ट्रीय T20 मधून निवृत्ती जाहीर केली आहे. दोघांचं वाढत वय पाहता विराट कोहली आणि रोहित शर्मा २०२७ चा वर्ल्डकप खेळणार का? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडतोय. २०२७ मध्ये रोहित शर्माचं वय 40 तर विराटचं वय 39 वर्षे असणार आहे. त्यामुळे ते तेव्हा खेळतील का हा प्रश्नच आहे. मात्र भारताचा नवनिवार्चित कोच गौतम गंभीरने (Gautam Gambhir) दोन्ही खेळाडूंच्या भविष्याबाबत मोठा दावा केला आहे..
प्रसारमाध्यमांशी बोलतांना गंभीर म्हणाला, “मला वाटते की रोहित शर्मा आणि विराट कोहली हे मोठ्या स्टेजवर काय करू शकतात ते त्यांनी दाखवून दिले आहे, मग तो टी-20 विश्वचषक असो किंवा 50 षटकांचा विश्वचषक असो… एक गोष्ट मी अगदी स्पष्टपणे सांगू शकतो की, विराट आणि रोहित मध्ये अजूनही खूप क्रिकेट बाकी आहे. महत्त्वाचे म्हणजे, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आणि ऑस्ट्रेलियाचा मोठा दौरा त्यांच्यासमोर पुढे आहे. या दोन्ही स्पर्धेत त्यांना पुरेशी प्रेरणा मिळेल.. आणि मग, आशा आहे की, जर त्यांनी त्यांची त्यांचा फिटनेस कायम राखला तर नक्कीच विराट कोहली आणि रोहित शर्मा 2027 चा वर्ल्डकप सुद्धा खेळतील.
मात्र गंभीर पुढे म्हणाला, आणखी किती काळ क्रिकेट खेळायचं या दोघांचाही वैयक्तिक निर्णय आहे. त्यांच्यात किती क्रिकेट शिल्लक आहे ते मी सांगू शकत नाही. पण हे त्यांच्यावर सुद्धा अवलंबून आहे कि संघाच्या यशात ते किती योगदान देऊ शकतात. रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत. जगातील कोणत्याही संघाची हीच इच्छा असेल कि त्यांनी जास्तीत जास्त काळ संघासोबत राहावं. आमचीही तीच इच्छा आहे असं गौतम गंभीरने स्पष्ट केलं. गंभीरच्या या विधानानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या चाहत्यांना नक्कीच आनंद झाला असेल यात शंकाच नाही.