हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीएल २०२४ च्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) सनरायजर्स हैद्राबादचा दारुण पराभव करत ट्रॉफीवर आपलं नाव कोरल. कर्णधार श्रेयश अय्यरचे कल्पक नेतृत्व आणि मेंटॉर गौतम गंभीरचे (Gautam Gambhir) मार्गदर्शन कोलकात्यासाठी महत्वाचे ठरले. या विजयानंतर मध्यरात्री गौतम गंभीरने सोशल मीडियावर एक खास अशी पोस्ट शेअर केली ज्यामुळे चर्चाना उधाण आलं आहे. गंभीरची ही पोस्ट म्हणजे एक श्लोक आहे परंतु त्याने या पोस्टमधून खूप काही सांगायचा प्रयत्न केला आहे.
काय आहे गंभीरची पोस्ट –
गौतम गंभीरने X वर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये “ज्याचे विचार आणि हालचाली सत्याच्या आहेत, त्याचा रथ आजही श्री कृष्ण चालवतो असं गंभीर म्हणाला. विशेष म्हणजे ही पोस्ट गंभीरने मध्यरात्री 2.33 वाजता शेअर केली. आता गंभीरला या वाक्यातून नक्की काय म्हणायचंय? गंभीरने ही पोस्ट कुणासाठी टाकली आहे? अशी चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे. मात्र गंभीरच्या या पोस्टवर जगभरातून चाहते कमेंटद्वारे कौतुक करत आहे.
“जिसकी मति और गति सत्य की हो,
— Gautam Gambhir (Modi Ka Parivar) (@GautamGambhir) May 26, 2024
उसका रथ आज भी श्री कृष्ण चलाते हैं”
KKR साठी गंभीर पुन्हा ठरला लकी –
दरम्यान, यापूर्वी गौतम गंभीरच्याच नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सने २०१२ आणि २०१४ ला आयपीएल ट्रॉफी जिंकली होती… त्यानंतर आता १० वर्षांनी आयपीएल जिंकण्यात कोलकाताला यश आले. गौतम गंभीरला यंदा केकेआरने टीमचा मेंटॉर केलं आणि पुन्हा एकदा कोलकात्याची नशीब फळफळले… गौतम गंभीरने सुनील नारायणला पुन्हा एकदा सलामीला पाठवण्याचा निर्णय घेतला आणि हाच निर्णय मोठा मास्टरस्ट्रोकी ठरला. नारायणने 15 सामन्यात 488 धावा केल्या. यामध्ये 1 शतक आणि 3 अर्धशतके त्याने झळकावली. सुनील नारायण हा यंदाच्या आयपीएल मधील प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ सुद्धा ठरला.