हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Gela Madhav Kunikade) गेल्या काही दिवसांपासून मराठी अभिनेता प्रशांत दामले यांच्या सोशल मीडिया हॅण्डलवर काही पोस्ट शेअर केल्या जात होत्या. ज्यामध्ये ६३ आकड्याचा वापर केल्याचे दिसत होते. आता हा आकडा नेमका का आणि कशासाठी वापरला जातोय? याचा काहीच कुणाला अंदाज येत नव्हता. अखेर या ६३ आकड्याचे कोडे उलगडले आहे. मराठी रंगभूमीवरील अत्यंत लोकप्रिय आणि गाजलेले नाटक ‘गेला माधव कुणीकडे’ हे ६३ प्रयोगांसाठी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
गेला माधव कुणीकडे पुन्हा रंगभूमीवर (Gela Madhav Kunikade)
वसंत सबनीस लिखित ‘गेला माधव कुणीकडे’ हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर परतत आहे. प्रशांत दामले यांनी सोशल मीडियावर अत्यंत आगळ्या पद्धतीने हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येत असल्याचे सांगितले. त्यांच्या पोस्ट भारी चर्चेचा विषयी ठरल्या होत्या.
प्रशांत दामले यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘गेला माधव कुणीकडे’ हे नाटक एकूण ६३ प्रयोगांसाठी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतं आहे. त्यामुळे आता नाट्यगृहात ‘अरे हाय काय नी नाय काय?’ हा संवाद पुन्हा एकदा घुमणार आहे.
कधी होणार शुभारंभ?
माहितीनुसार, ‘गेला माधव कुणीकडे’ हे नाटक ७ डिसेंबर १९९२ रोजी रंगभूमीवर दाखल झाले होते. या नाटकाचे १८२२ प्रयोग झाले आहेत. मध्यंतरी काही वर्षे या नाटकाने ब्रेक घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झालं आहे.
(Gela Madhav Kunikade) गौरी थिएटर्स निर्मित आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रकाशित ‘गेला माधव कुणीकडे’ या नाटकाचा शुभारंभ १५ जून २०२४ रोजी वाशी येथील विष्णुदास भावे सभागृहात दुपारी ४.०० वाजता होणार आहे. तर नाटकाच्या शुभारंभ प्रयोगाची तिकीट विक्री १ जून २०२४ रोजी फक्त ‘तिकीटलाय’ अॅपवर सुरु होणार आहे.
प्रशांत दामलेंनी व्यक्त केला आनंद
अभिनेते प्रशांत दामले गेल्या अनेक वर्षांपासून नाट्यरसिकांचे भरभरून मनोरंजन करत आहेत. त्यामुळे रंगभूमीवरील त्यांचा वावर प्रेक्षकांना सुद्धा हवाहवासा वाटू लागला आहे. एकापेक्षा एक सर्रास कलाकृती आणि एकापेक्षा एक कमाल पात्र रंगवून त्यांनी कायम रंगभूमीची शान वाढवली आहे. (Gela Madhav Kunikade) अशातच, प्रशांत दामले यांचे अत्यंत गाजलेले ‘गेला माधव कुणीकडे’ हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर अवतरणार आहे. याबाबत बोलताना प्रशांत दामले म्हणाले, ‘काही नाटकांना रसिकांचं अफाट प्रेम लाभतं. ”गेला माधव कुणीकडे” हे नाटक त्यापैकीच एक. मायबाप रसिकांसाठी हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणताना अतिशय आनंद होत आहे’.