.. अन्यथा तुमचं तोंड बंद ठेवा! ट्रम्प यांना पोलीस अधिकाऱ्याने सुनावले खडे बोल

0
75
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ह्युस्टन । अमेरिकेत मिनियापोलिसमध्ये पोलीस कस्टडीत कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉइडच्या हत्येनंतर वर्णद्वेष विरोधी आंदोलन अमेरिकेत चिघळत आहे. अनेक राज्यांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. आंदोलकांचा ट्रम्प यांच्याविरोधात रोष वाढत असताना पोलिस अधिकाऱ्यांनी ट्रम्प यांना खडे बोल सुनावले. अमेरिकेतील वाढत्या हिंसाचाराला अटकाव करण्यासाठी लष्कराला पाचारण करणार असल्याचे ट्रम्प यांनी जाहीर केले. हिंसाचाराच्या घटना हे राज्य प्रशासनाचे अपयश असल्याचेही ट्रम्प यांनी सांगितले. ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर ह्युस्टन पोलीस प्रमुख आर्ट एक्वेडो यांनी ट्रम्प यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

त्यांनी सांगितले की, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना सांगू इच्छितो की, जर तुमच्याकडेही काही बोलण्यासाठी ठोस मुद्दे नाहीत. तर, किमान आपले तोंड बंद ठेवायला हवे. ट्रम्प यांच्यामुळे देशातील २०-२१ वर्षाच्या मुलांचे आयुष्य धोक्यात आले आहे. लोकांनी रस्त्यावर यावे आणि आक्रमक व्हावे असे आम्हाला वाटत नाही, असेही त्यांनी सांगितले. देशाला सध्या एका नेतृत्वाची आवश्यकता आहे. या काळात आपण सर्व एक आहोत, अशी भावना राष्ट्राध्यक्षांकडून लोकांमध्ये जाण्यास हवी, असेही त्यांनी म्हटले.

दरम्यान, ट्रम्प यांनी एक जून रोजी राज्यांच्या राज्यपालांसह व्हिडिओ कॉन्फरन्सवर संवाद साधला. यावेळी त्यांनी आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यास सांगितले. आंदोलन मोडून काढून आंदोलकांना तुरुंगात डांबायला हवे. हे जर करता येत नसेल तर तु्म्ही वेळेचा अपव्यय करत आहात, असेही ट्रम्प यांनी म्हटले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विट, वक्तव्यांमुळे परिस्थिती आणखी चिघळत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here