Google Pixel 7 वर मिळवा 28,000 रुपयांपर्यंतची सूट, अशा प्रकारे घ्या ऑफरचा लाभ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Google Pixel 7: जर आपण नवीन स्मार्टफोन घेणार असाल तर तर ही बातमी आपल्यासाठी उपयोगाची ठरेल. कारण आजच्या या बातमीमध्ये आपण Google च्या नवीन Pixel 7 फोनबाबत जाणून घेणार आहोत. कारण सध्या हा फोन 28,000 रुपयांच्या सवलतीमध्ये खरेदी करण्याची संधी मिळते आहे.

Google Pixel 7 Pro review: excellent camera, unreliable phone | Digital  Trends

ऑनलाईन ई-कॉमर्स कंपनी असलेल्या फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन 32,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. ऑक्टोबर 2022 मध्ये 59,999 रुपयांच्या किंमतीमध्ये Google Pixel 7 लॉन्च करण्यात आला होता. मात्र सध्या Flipkart Plus मेंबर्सना यावर 23,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट मिळतो आहे.

याशिवाय, HDFC बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या ट्रान्सझॅक्शनवरही 5,000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळू शकेल. तसेच Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डधारकांनाही या फोनच्या खरेदीवर 5% सूट मिळू शकेल.

Google Pixel 7 Pro Review: Big Shot - Tech Advisor

Google Pixel 7 च्या फीचर्स बाबत बोलायचे झाल्यास या स्मार्टफोनमध्ये 2400×1080 पिक्सेल रिझोल्यूशन असलेला 6.32-इंच फुल एचडी + OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याच्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. तसेच हा स्मार्टफोन लेमनग्रास, ऑब्सिडियन ब्लॅक आणि स्नो व्हाइट या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.

या स्मार्टफोनमध्ये Tensor G2 चिपसेट दिली गेली आहे. ज्यामध्ये 8GB रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेज आहे. या स्मार्टफोनमध्ये 50MP प्रायमरी लेन्स, 12MP सेन्सरसहीत ड्युअल कॅमेरा सिस्टीम दिली गेली आहे. तसेच याच्या फ्रंट साईडला 10.8MP सेल्फी स्नॅपर उपलब्ध आहे.

Google Pixel 7 Pro review: Android's new flagship ace | T3

यासोबतच या स्मार्टफोनमध्ये 4,335mAh बॅटरी दिली गेली आहे जी 20W वायर्ड आणि वायरलेस फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. यासोबतच रिव्हर्स वायरलेस चार्जिंग तंत्रज्ञान देखील आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G LTE, Wi-Fi 6E, ब्लूटूथ 5.2, GOS, NFC आणि USB टाइप-सी चा समावेश आहे.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या :  https://www.flipkart.com/google-pixel-7-lemongrass-128-gb/p/itm45d75002be0e7

हे पण वाचा :
Poco C50 : अवघ्या 6,499 रुपयांच्या ‘या’ स्मार्टफोनमध्ये मिळवा जबरदस्त फीचर्स
Fixed Deposits : खुशखबर !!! ‘या’ NBFC कंपनीकडून FD वर 9.36% पर्यंत व्याज मिळवण्याची संधी
Indian Bank कडून ग्राहकांना धक्का, बँकेने कर्जावरील व्याजदरात केली वाढ
Multibagger Stock : गेल्या 23 वर्षांत ‘या’ कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस
Money Laundering म्हणजे काय ??? याद्वारे काळा पैसा पांढरा कसा केला जातो हे समजून घ्या