Jio Plans : देशात सर्वाधिक वापरकर्ते हे रिलायन्स जिओचे आहेत. जिओ हे वेळोवेळी ग्राहकांसाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन घेऊन येत असते. अशा वेळी जर तुम्हीही जिओचे वापरकर्ते असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता तुम्ही जिओ एअर फायबर सेवेचा लाभ घेऊ शकता. कंपनीची ही सेवा ग्राहकांचे पुरेपूर मनोरंजन करते.
यामध्ये यूजर्सना एअर फायबर आणि एअर फायबर मॅक्स प्लॅनचा पर्याय दिला जात आहे. या दोन्ही प्लॅनमध्ये तुम्हाला हाय-स्पीड इंटरनेट स्पीडसह भरपूर डेटा आणि अनेक अतिरिक्त फायदे मिळणार आहेत. तसेच यामध्ये तुम्हाला 100 ते 300Mbps पर्यंत स्पीड मिळेल. हे प्लॅन 1000GB डेटासह येतात. याशिवाय, तुम्हाला 550 हून अधिक टीव्ही चॅनेलचा ऍक्सेस देखील मिळेल. एवढेच नाही तर हे प्लॅन नेटफ्लिक्स आणि प्राइम व्हिडीओ सारख्या OTT अॅप्सचा देखील ऍक्सेस देतात.
Jio Air Fiber च्या या प्लानमध्ये 100Mbps स्पीड
जीओचा 899 रुपयांचा प्लॅन जाणून घ्या
नवीन वापरकर्ते 6 किंवा 12 महिन्यांसाठी Jio Air Fiber च्या या प्लॅनचे सब्सक्राइब घेऊ शकतात. या प्लॅनमध्ये इंटरनेट वापरण्यासाठी 100Mbps च्या स्पीडने 1000GB डेटा दिला जात आहे. हा प्लॅन 550 हून अधिक टीव्ही चॅनेलमध्ये प्रवेश देते. तसेच या प्लॅनमध्ये, तुम्हाला Sony Liv, Disney + Hotstar, Zee5, Discovery Plus आणि Eros Now यासह अनेक OTT अॅप्ससह Jio सिनेमाचा मोफत ऍक्सेस मिळेल.
जिओ एअर फायबर 1199 रुपयांचा प्लान
जिओच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 100Mbps इंटरनेट स्पीड मिळेल. या प्लॅनमध्ये 1000GB डेटा मिळतो. यामध्ये 550 हून अधिक टीव्ही चॅनेल्सनाही ऍक्सेस दिला जात आहे. तसेच Jio Air Fiber च्या या प्लॅनमध्ये तुम्हाला Netflix, Amazon Prime Video, Jio Cinema, Disney + Hotstar, Sony Liv आणि Zee5 सारख्या अॅप्सचा मोफत ऍक्सेस मिळेल.
300Mbps स्पीड असणारा प्लान जाणून घ्या
Jio Air Fiber Max चा 1499 रुपयांचा प्लान
दरम्यान, Jio Air Fiber Max चा हा प्लान वापरकर्त्यांना इंटरनेट वापरण्यासाठी एकूण 1000GB डेटा देतो. प्लॅनमध्ये तुम्हाला 300Mbps चा अपलोड आणि डाउनलोड स्पीड मिळेल. नवीन वापरकर्ते 6 ते 12 महिन्यांसाठी या प्लानचे सब्सक्राइब घेऊ शकतात. तसेच या प्लॅनमध्ये कंपनी 550 हून अधिक टीव्ही चॅनेलला प्रवेश देत आहे. जीओचा हा प्लॅन Sony Liv, Disney + Hotstar, Amazon Prime Video, Netflix Basic आणि Zee5 यासह अनेक अॅप्सचा मोफत ऍक्सेस देते.