हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Post Office कडून नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या बचत योजना चालवल्या जातात. या योजनांमध्ये गुंतवणूक करून चांगल्या रिटर्न बरोबरच सुरक्षेची हमी देखील मिळते. तसेच सरकारच्या पाठिंब्यामुळे या बचत योजना पूर्णपणे जोखीममुक्त देखील आहेत. यामुळे देशभरातील लाखो लोकांनी पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूकीस प्राधान्य दिले आहे.
जर आपल्यालाही पैसे गुंतवायचे असतील तर आज आपण Post Office एका स्कीमबाबत जाणून घेउयात. हे लक्षात घ्या कि, पोस्ट ऑफिसची ही एक सर्वात फायदेशीर गुंतवणूक योजना आहे. यामध्ये आपल्याला डेली फक्त 170 रुपये गुंतवून मॅच्युरिटीवर 19 लाख रुपये मिळू शकतील.
अशा प्रकारे मिळवा 19 लाख रुपये
ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांसाठी Post Office ची ही योजना खूप चांगली आहे. या योजनेचे नाव ग्राम सुमंगल ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजना असे आहे. यामध्ये दिवसाला 170 रुपयांची बचत करून 19 लाख रुपये मिळवता येतील.
कोणाकोणाला गुंतवणूक करता येईल ???
ग्राम सुमंगल योजना 15 वर्षे आणि 20 वर्षांसाठी घेता येईल. तसेच 19 वर्षे ते 45 वर्षे वय असलेल्या कोणत्याही भारतीय नागरिकाला याचा लाभ घेता येईल. याबरोबर या योजनेमध्ये पॉलिसीधारकाच्या हयातीवर, संपूर्ण संरक्षणासोबतच पैसे परत करण्याचा लाभ देखील उपलब्ध आहे. म्हणजेच, यामध्ये गुंतवलेली रक्कम पूर्णपणे परत केली जाईल. त्याच वेळी, यामध्ये पॉलिसीधारकाला मॅच्युरिटीवर बोनस देखील मिळेल. Post Office
मिळेल 10 लाख रुपयांची विमा रक्कम
याअंतर्गत, 10 लाख रुपयांची विमा रक्कम मिळते. त्याच वेळी, या पॉलिसी दरम्यान पॉलिसीधारकाच्या जगण्यावर त्याला 6 वर्षे, 9 वर्षे आणि 12 वर्षांसाठी 20 टक्के पर्यंत रक्कम परत मिळतील. यानंतर, मॅच्युरिटीवर बोनससहीत उर्वरित 40 टक्के रक्कम देखील मिळेल. Post Office
बोनस किती मिळेल ???
यामध्ये 15 वर्षांच्या प्रीमियम टर्मसाठी बोनसची रक्कम 6.75 लाख रुपये असेल. तसेच प्रीमियम टर्म 20 वर्षे असेल तर बोनसची रक्कम 9 लाख रुपये असेल. यामध्ये विम्याची रक्कम 10 लाख रुपये असल्याने 15 वर्षानंतर एकूण लाभ 16.75 लाख रुपये असेल. तसेच 20 वर्षांनंतर, एकूण मॅच्युरिटीची रक्कम 19 लाख रुपये असेल. Post Office
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.indiapost.gov.in/Financial/Pages/Content/rpli.aspx
हे पण वाचा :
गेल्या एका महिन्यात ‘या’ Multibagger Stock ने दिला 251% रिटर्न !!!
Union Bank of India कडून ग्राहकांना धक्का !!! MCLR आधारित कर्ज दरात केला बदल
Oral Health Foundation च्या माध्यमातून 300 रुग्णांची मोफत दंत तपासणी ; भानुशाली परिवाराचा स्तुत्य उपक्रम
Train Cancelled : रेल्वेकडून 128 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासा
Gold Price Today : सणासुदीच्या हंगामात सोन्या-चांदीच्या दरात आणखी घसरण, नवीन दर पहा