नवी दिल्ली । सणासुदीच्या काळात प्रत्येकजण आपापल्या घरी जाण्याची योजना आखत असतो, परंतु बर्याच वेळा आपण तिकिटांचे बुकिंग न केल्यामुळे किंवा वेटिंग असल्यामुळे आपल्याला घरी जाणे शक्य होत नाही… तर यावेळी तुम्ही दिवाळी आणि छठपूजे साठी घरी जाण्यासाठी अगोदरच तिकिट बुक करा. IRCTC अॅपद्वारे तुम्ही तिकिट बुकिंग करू शकता. आपल्या अॅपला आधारशी (Aadhaar IRCTC Linking) जोडल्यास आपण एका आयडीसह 6 ऐवजी 12 तिकिटे बुक करू शकता. आपल्याला 6 ऐवजी 12 तिकिटे कशी बुक करता येईल हे जाणून घेउयात…
लिंक करण्याचे काय फायदे आहेत?
आपल्या IRCTC खात्यावर आधार लिंक केल्यावर तिकिट बुक करणे सोपे होते. याशिवाय सर्वात खास गोष्ट म्हणजे लिंक केल्यावर तुम्ही आयडीसह एका महिन्यात 12 तिकिट बुक करू शकता. त्याच वेळी, जर आपल्या खात्याला लिंक केलेला नसेल तर आपण केवळ 6 तिकीट बुक करू शकाल. मात्र, ही एक अनिवार्य प्रक्रिया नाही, परंतु जर आपण यास लिंक केले तर आपल्याला अतिरिक्त लाभ घेऊ शकता.
आयआरसीटीसी खात्याशी आधार क्रमांक कसा जोडायचा –
1. IRCTC वेबसाइट irctc.co.in वर भेट द्या.
2. तुम्हाला तेथे युझर आयडी व पासवर्ड द्यावा लागेल.
3. माय प्रोफाइल टॅबमधील आधार केवायसी वर क्लिक केल्यानंतर.
4. या ठिकाणी आधार क्रमांक टाकल्यानंतर रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठविला जाईल.
5. ओटीपी एन्टर केल्यानंतर व्हेरिफाय ऑप्शनवर क्लिक करा.
6. त्यानंतर सबमिटवर क्लिक करण्यापूर्वी आधार नंबरचे व्हेरिफिकेशन करा.
प्रवाशांना आधार क्रमांकाशी अशा प्रकारे जोडावे-
1. सर्व प्रथम, आपल्याला IRCTC च्या वेबसाइटवर जावे लागेल.
2. आता युझरनेम व पासवर्ड टाका.
3. यानंतर, प्रोफाइल विभागात ‘मास्टर लिस्ट’ वर क्लिक करा.
4. आधार कार्डावर असलेल्या आधार क्रमांक, जेंडर, जन्मतारीख यासारख्या नवीन प्रवाश्यांचा तपशील द्या.
5. ते सबमिट करा.
6. व्हेरिफिकेशन नंतर तुम्हाला वेरिफाइड असे लिहिलेले दिसेल.
यावर्षी रेल्वे अनेक स्पेशल गाड्या धावत आहे
दिवाळी आणि छठ पूजे साठी रोजी घरी जाणाऱ्यांना अडचणी उद्भवू नये म्हणून यावर्षी सणासुदीपूर्वी भारतीय रेल्वे अनेक स्पेशल गाड्या चालवित आहे. या सर्व गाड्या 20 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर 2020 दरम्यान धावतील. या सर्व गाड्या देशातील वेगवेगळ्या जिल्ह्यात जातील.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.