Senior Citizen Savings Scheme द्वारे वृद्धांना दरवर्षी मिळतील लाखो रुपये, कसे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Senior Citizen Savings Scheme : केंद्र सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना जास्त नफा देखील मिळतो. केंद्र सरकारकडून सुरु करण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये गॅरेंटेड रिटर्न मिळतो.

हे लक्षात घ्या कि, भारतीय टपाल कार्यालयामार्फत ही योजना चालवली जाते. तसेच सरकारची गॅरेंटी असल्याने ती पूर्णपणे सुरक्षित देखील आहे. 60 वर्षे किंवा त्याहून जास्त वय असलेल्या कोणत्याही भारतीय नागरिकाला पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडता येईल. यानंतरच त्यांना या योजनेत गुंतवणूक करता येईल. या योजनेमध्ये वार्षिक 1,000 ते 15 लाख रुपयांची गुंतवणूक करता येईल. तसेच या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी हा 5 वर्षांचा असेल. Senior Citizen Savings Scheme

Know about SBI Senior Citizen Savings Scheme (SCSS)

FD पेक्षा जास्त व्याजदर मिळेल

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतील व्याजदर हा बहुतांश बँकांच्या FD पेक्षा जास्त आहेत. यामुळेच यामध्ये पैसे गुंतवणे जास्त फायदेशीर ठरू शकेल. या योजनेसाठी केंद्र सरकारकडून वार्षिक 7.4 टक्के रिटर्न दिला जातो आहे. सध्याच्या महागाईच्या काळातही याद्वारे चांगला रिटर्न मिळतो आहे. Senior Citizen Savings Scheme

5 वर्षांसाठी निश्चित केला जातो व्याजदर

या योजनेची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामधील व्याजदर संपूर्ण मुदतपूर्तीपर्यंत सारखेच राहतात. उदाहरणार्थ, जर आज या योजनेअंतर्गत खाते उघडले तर पुढील 5 वर्षांसाठी आपल्याला 7.4 टक्के व्याज मिळेल. जर या योजनेतील गुंतवणुकीची जास्तीत जास्त लिमिट 15 लाख रुपये असेल, तर या रकमेवर वार्षिक 1.11 लाख रुपयांचे व्याज मिळेल. मात्र, हे व्याज दर तिमाहीला दिले जाते. त्यामुळे दर तीन महिन्यांनी 27,750 रुपये मिळतील. Senior Citizen Savings Scheme

Opinion | Where has all the money gone from the system? | Mint

पती-पत्नी दोघांनाही करता येईल गुंतवणूक

या योजनेमध्ये पती-पत्नी या दोघांनाही गुंतवणूक करता येईल. तसेच जर या दोघांनी एकत्र पैसे गुंतवले तर गुंतवणुकीची रक्कम दुप्पट होईल. मात्र, केंद्र सरकारकडून दोघांनाही वेगवेगळ्या मर्यादा दिल्या आहेत. म्हणजेच पतीला 15 लाख आणि पत्नीला 15 लाख गुंतवता येतील. अशा प्रकारे, आपल्या 30 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर वार्षिक 7.4 टक्के दराने 2.22 लाख रुपये व्याज मिळेल. जो पूर्णपणे जोखमी फ्री असेल. Senior Citizen Savings Scheme

Senior Citizen Savings Scheme ; Salient Features explained | DeshGujarat

टॅक्स सूट देखील मिळेल

हे लक्षात घ्या कि, या योजनेतील गुंतवणुकीवर आयकर कलम 80C अंतर्गत सूट देण्यात आली आहे. यामध्ये आपल्याला वार्षिक 1.5 लाख रुपयांच्या टॅक्स सूट मिळवण्यासाठी क्लेम करता येईल. यामधील गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावर TDS कापला जाईल, मात्र फॉर्म 15G आणि 15H सबमिट करून TDS वर सूट मिळेल. मात्र मिळणारे व्याज हे 50,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर टॅक्स भरावा लागेल. तसेच जर आपल्याला हवे असेल तर मॅच्युरिटीनंतरही, ही योजना 3 वर्षांसाठी सुरू ठेवता येईल. तसेच यावरही आधी सारखेच व्याज मिळेल. Senior Citizen Savings Scheme

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.indiapost.gov.in/Financial/pages/content/post-office-saving-schemes.aspx

हे पण वाचा :

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठा बदल, आजची किंमत तपासा

‘या’ Multibagger Stock ने गेल्या 6 वर्षात दिला 497% रिटर्न

Amazon Sale मध्ये अर्ध्या किंमतीत मिळत आहेत ‘हे’ प्रीमियम 4K स्मार्ट टीव्ही

Investment Tips : ‘या’ योजनांमध्ये गुंतवणूक करून 3 वर्षांत जमा करा 10 लाख रुपये

Bank Holiday : पुढील महिन्यात 21 दिवस बँका राहणार बंद !!! सुट्ट्यांची लिस्ट पहा