हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LIC कडून 1 मार्च 2022 पासून एक पेन्शन योजना सुरू केली गेली आहे. पेन्शन योजनेमध्ये फक्त एकदाच गुंतवणूक करून आपल्याला रिटायरमेंटनंतर आजीवन पेन्शन मिळेल. LIC च्या वेबसाइटवरील माहितीनुसार, 40 वर्षांवरील कोणत्याही व्यक्तीला हा प्लॅन खरेदी करता येईल. यासाठीची जास्तीची वयोमर्यादा 80 वर्षे आहे. ही योजना पती-पत्नी दोघांसाठी एकत्रितपणे खरेदी करता येईल, ज्यामध्ये 60 वर्षांनंतर पेन्शन दिली होईल. यामध्ये जोपर्यंत जोडीदारांपैकी एक जण जिवंत आहे तोपर्यंत पेन्शन मिळेल. जर दोघेही नसतील तर नॉमिनी व्यक्तीला पैसे केले जातील.
पेमेंटसाठी 4 पर्याय
हा पेन्शन प्लॅन खरेदी करणाऱ्या व्यक्तीला कंपनीकडून पेमेंटसाठी चार पर्याय दिले जातात. यामध्ये पेन्शन दरमहा, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक आधारावरही घेता येईल. या योजनेअंतर्गत, किमान 1,000 हजार मासिक पेन्शन दिली जाईल. इथे हे लक्षात घ्या कि, यामध्ये जितकी जास्त रक्कम गुंतवाल तितकी जास्त पेन्शन मिळेल.
कंपनीने तयार केले 5 प्राइस बँड
यामध्ये सर्वात कमी रकमेचा इन्शुरन्स प्लॅन 2 लाखाच्या खाली असेल.
दुसरा प्राइस बँड 2 लाख ते 5 लाख रुपयांचा असेल.
तिसर्या प्राइस बँडमध्ये तुम्ही 5 लाख ते 10 लाखांचा प्लॅन खरेदी करता येईल.
चौथ्या प्राइस बँडमध्ये 10 लाख ते 25 लाखांपर्यंत गुंतवणूक करता येईल.
शेवटचा प्राइस बँड 25 लाखांपेक्षा जास्त असेल.
पॉलिसीवर कर्ज देखील घेता येईल
LIC ची ही सरल पेन्शन पॉलिसी खरेदी केल्याच्या 6 महिन्यांनंतर कंपनीकडून कर्जाची सुविधा उपलब्ध होईल. यामध्ये आपल्याला मिळणाऱ्या पेन्शनच्या आधारावर कर्जाची रक्कम ठरवली जाईल. कर्जावरील व्याज आपल्याला मिळणार्या पेन्शनच्या 50% पेक्षा जास्त नसेल. जॉईंट प्लॅन, कर्ज फक्त पहिल्या लाभार्थ्याला दिले जाईल आणि त्याच्या अनुपस्थितीत, दुसरा लाभार्थी कर्ज घेऊ शकेल.
पॉलिसी सरेंडर केल्यास…
पॉलिसीमध्ये नमूद केल्यानुसार गंभीर आजारामुळे सरेंडर केल्यास कंपनी एकूण फंड व्हॅल्यूच्या 95 टक्के रक्कम देईल. याचा अर्थ असा की जर आपण 10 लाख रुपयांची पॉलिसी घेतलीअसेल, तर पॉलिसी सरेंडर केल्यावर 9.5 लाख रुपयेच परत मिळतील. मात्र, जर त्यावर कर्ज घेतले असेल तर कर्जाची मूळ रक्कम आणि व्याज त्यातून वजा केले जाईल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://licindia.in/Products/Pension-Plans/LIC-s-Saral-Pension-PLan-No-862,-UIN-No-512N342V02
हे पण वाचा :
BSNL ने लाँच केले 2 खास मंथली प्लॅन, या प्लॅनविषयी जाणून घ्या
Mutual Fund मध्ये गुंतवलेले पैसे कधी काढावे ??? हे तज्ञांकडून समजून घ्या
सोन्यामध्ये घसरण झाल्यामुळे Gold Loan वर काय परिणाम होतो ??? जाणून घ्या
Karnataka Bank च्या FD वरील व्याजदरात वाढ, नवीन दर पहा
FD Rates : ‘या’ NBFC ने FD वरील व्याजात पुन्हा केली वाढ, नवीन दर तपासा