हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Pan Card हे सध्याच्या काळात आर्थिक कामातील महत्वाच्या डॉक्युमेंटन्सपैकी एक आहे. सध्या जवळपास प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी ते बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय कोणतेही सरकारी अथवा खाजगी काम पूर्ण होऊ शकणार नाही. पॅनकार्डसंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता आपल्याला पॅन कार्डसाठी सरकारी कार्यालयामध्ये फेऱ्या मारण्याची काहीच गरज नाही. कारण आता पॅनकार्डसाठी ऑनलाइन अर्ज करता येईल. याबरोबरच ते आपल्याला थेट घरी मिळू शकेल. चला तर मग घरबसल्या Pan Card ऑनलाइन ऑर्डर करण्याची प्रक्रिया जाणून घेउयात…
घरबसल्या Pan Card साठी अर्ज करण्यासाठी https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल
यानंतर आपल्यासमोर एक फॉर्म उघडेल.
त्यामधील Apply Online हा पर्याय निवडून एक फॉर्म भरावा लागेल.
आता आपल्याकडे पॅनकार्ड आहे की नाही हे सांगावे लागेल. त्यानंतर श्रेणी निवडावी लागेल.
आता शीर्षक निवडावे लागेल आणि नाव, जन्मतारीख, ईमेल आयडी, मोबाइल नंबर भरून ते सबमिट करा.
यानंतर आपली आवश्यक कागदपत्रे अपलोड करून फॉर्म सबमिट करावा लागेल.
आता Pan Card फी भरून सबमिट करा पॅन कार्ड फॉर्मवर क्लिक करा.
यानंतर, 15 रजिस्ट्रेशन नंबर जनरेट केला जाईल. याद्वारे आपले अप्लिकेशन ट्रॅक करता येईल.
पॅनकार्ड बनल्यावर ते भारतीय टपालाद्वारे आपल्या घरी पाठवले जाईल.
हे पण वाचा :
PM Kisan योजनेबाबत सरकारचे मोठे वक्तव्य, शेतकऱ्यांचे पैसे वाढवण्यावर सांगितले कि…
UMANG App द्वारे PF खात्यातील पैसे काढण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या
‘या’ Jio Fiber Plan अंतर्गत अनलिमिटेड इंटरनेट डेटासहीत मिळवा फ्री कॉलिंग
ईशान्येकडील सुंदर स्थळांना भेट देण्यासाठी IRCTC चे अप्रतिम टूर पॅकेज !!! किती खर्च येईल ते पहा
New Business Idea : दरमहा लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवण्यासाठी सुरू करा ‘हा’ व्यवसाय, सरकारकडूनही मिळेल मदत