नवी दिल्ली । जर तुम्ही स्वतःसाठी पेन्शन योजना घेण्याचा विचार करत असाल, तर भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) तुमच्यासाठी एक उत्तम योजना घेऊन आले आहे. ही पॉलिसी घेताना, तुम्हाला त्याचा प्रीमियम एकदाच भरावा लागेल आणि त्यानंतर तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळत राहील. सरल पेन्शन योजना असे या पॉलिसीचे नाव आहे. LIC सरल पेन्शन योजना ही सिंगल प्रीमियम योजना आहे. ही योजना 1 जुलैपासून सुरू झाली आहे. चला तर मग याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात …
सरल पेन्शन योजना घेण्याचे 2 मार्ग: LIC सरल पेन्शन योजना दोन प्रकारची आहे पहिला लाइफ एन्युटी विथ 100 परसेंट रिटर्न ऑफ परचेज प्राइस आणि दूसरा पेंशन योजना जॉइंट लाइफ.
सिंगल लाइफ: यामध्ये पॉलिसी कोणाच्याही नावावर असेल, म्हणजेच ही पेन्शन योजना कोणत्याही एका व्यक्तीशी जोडली जाईल. जोपर्यंत पेन्शनधारक जिवंत आहेत, तोपर्यंत त्यांना पेन्शन मिळत राहील. त्यानंतर नॉमिनीला बेस प्रीमियम मिळेल.
जॉइंट लाईफ: या प्लॅनमध्ये पती आणि पत्नी दोघांनाही कव्हरेज आहे. यामध्ये जो दीर्घकाळ जगतो, त्याला पेन्शन मिळते. जेव्हा दोघेही नसतील तेव्हा नॉमिनीला बेस प्रीमियम मिळेल.
सरल पेन्शन योजनेची वैशिष्ट्ये
>> विमाधारकाची पॉलिसी काढताच त्याची पेन्शन सुरू होईल.
>> आता हे तुमच्यावर अवलंबून असेल की तुम्हाला दरमहा किंवा तिमाही, सहामाही किंवा वार्षिक पेन्शन हवी आहे. हा पर्याय तुम्हाला स्वतः निवडावा लागेल.
>> ही पेन्शन योजना ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही घेता येईल.
>> या योजनेत किमान 12000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही.
>> ही योजना 40 ते 80 वयोगटातील लोकांसाठी आहे.
>> या योजनेत, पॉलिसीधारकाला पॉलिसी सुरू झाल्याच्या तारखेपासून 6 महिन्यांनंतर कधीही कर्ज मिळेल.