औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व घाटी रुग्णालयात आस्थापनेवरील कंत्राटी कामगारांचा दर महिन्याला उशिराने होणाऱ्या वेतनाबाबत ञस्त झाले आहेत. महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना संलग्न आयटक ने वारंवार घाटी प्रशासनास वारंवार निवेदन देऊन मासिक वेतन वेळेत देण्याची मागणी केली आहे. अनेकदा उपोषण देखील केले. मात्र तरीही मागण्या मान्य झाल्या नसल्याने दोन दिवसात कामगारांना वेतन नाही मिळाले तर काम बंद आंदोलन करू असा इशारा आयटक संलग्न महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
कंत्राटी कामगारांना वेळेत वेतन न मिळाल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बँकेचे हफ्ते वेळेवर भरता येणे शक्य नाही. घाटीत हजारो कोव्हीड रूग्णांना रूग्णसेवा देण्याची जबाबदारी कर्मचारी पार पाडत असताना या कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. वेतनासाठी गेल्या १२८ दिवसांपासून उपोषण केले गेले. मात्र अजूनही मागणी पूर्ण झाली नाही.
पगार आणि बोनस दिलेला नाही. म्हणून येत्या दोन दिवसांत जर पगार आणि बोनस मिळाला नाही तर नाईलाजाने काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशाराही महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना संलग्न आयटकतर्फे अॅड. अभय टाकसाळ, विकास गायकवाड, किरण पंडित, भालचंद्र चौधरी, गजानन खंदारे, महेंद्र मिसाळ, अभिजीत बनसोडे, श्रीयोग वाघमारे,बंटी खरात, अझहर शेख, गौतम शिरसाठ, संगिता शिरसाठ, विद्या हिवराळे, नंदा हिवरले, आनंद सुरडकर, ज्योती खरात, अतिष दांडगे, सुनिल खरात, ऋतिक जाधव, निलेश दिवेकर, कविता जोगदंडे, सविता घागरे, नीता भालेराव, श्रीकांत, वंदना जोगदंडे, विजय नागोबा, सविता सोनवणे यांच्या वतीने देण्यात आला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group