कोल्हापूर | सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील गोठणे येथे एक किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. विनापरवाना शस्त्रासह शिकारीसाठी घुसलेल्यांनी माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट केली आहे. शिकारीसाठी म्हणून जंगलात गेलेल्या काहींनी चक्क घोरपडीवरच बलात्कार केला आहे. संशयित आरोपीचे मोबाईल तपासले असता हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे वन खातेही चक्रावले असून सदर आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
या आरोपींनी केलेला घृणास्पद प्रकार मोबाईलमध्ये पुरव्यासह असला तरी कोणता गुन्हा नोंद करायचा हा प्रश्न वनविभागाच्या समोर उभा राहिला आहे. या प्रकरणी संदीप तुकाराम पवार, मंगेश जनार्दन कामतेकर, अक्षय सुनिल कामतेकर अशी अटक केलेल्या आरोपींची नावं असून त्यांनी आपला गुन्हा कबुल केला आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात तिघे कोकणातून कोल्हापुरातील चांदोलीमध्ये शिकारीसाठी आलेले होते. संशयित आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून एक धक्कादायक माहितीचा खुलासा झाला आहे. या आरोपीनी एका घोरपडीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आता या आरोपींवर कोणत्या कलमाखाली कारवाई करायची यावर वन अधिकारी चर्चा करत आहेत.
व्याघ्र गणनेसाठी लावण्यात आलेल्या ट्रॅप कमेर्यामुळे या शिकारींना अटक करण्यात वनविभागाला यश मिळालं होतं. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या आरोपींचे मोबाईल तपासले असता हा प्रकार उघडकीस आला आहे. यातील एका आरोपीने घोरपडीवर बलात्कार केला असून त्यावेळचे चित्रिकरण मोबाईलमध्ये करण्यात आले होते. आता त्यावरुनच या आरोपींवर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र वनविभागासमोर एकच प्रश्न आहे तो म्हणजे या आरोपींवर कोणत्या कलमांखाली गुन्हा नोंद करायचा.
एखादा शिकारी आला तर, त्याने शिकार केली तर त्याच्यावर कोणत्या कलमांतर्गत कारवाई करायची हे ठरलेलं असतं. पण आता वन्यप्राण्यावर बलात्कार केल्यामुळे कशी कारवाई करायची हा पेच वन्य अधिकाऱ्यांसमोर आहे.