… तर साखरेचा एक कणही कारखान्यातून बाहेर पडू देणार नाही; राजू शेट्टींचा केंद्राला इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर । केंद्र सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली तर कारखान्यांमधून साखरेचा एक कणही बाहेर पडू देणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला. तसेच यंदा शेतकऱ्यांना एफआरपी एकरकमी मिळावा. ज्या साखर कारखान्यांनी गेल्यावर्षीचा एफआरपी अजून दिलेला नाही त्यांचे कारखाने सुरु होऊ देणार नाही, असेही राजू शेट्टी यांनी सांगितले. कोल्हापुरात सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या 19व्या ऊस परिषदेत राजू शेट्टी बोलत होते. (Raju Shetty demand to give 14 percent extra FRP to sugercane farmers)

ऊसतोड मजुरांना 14 टक्के वाढीव मजुरी मिळाली त्याप्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही 14 टक्के वाढीव एफआरपी द्यावा. यावेळी त्यांनी ऊस उत्पादकांना 14 टक्के वाढीव एफआरपी देण्याच्या मागणीवर ठाम असल्याचे सांगितले. गेल्या वर्षीच्या तुलनेत केंद्र सरकारने एफआरपी 100 रूपयांनी वाढवला आहे. परंतु, 14 टक्क्यानुसार एफआरपीची रक्कम 382 रुपयांनी वाढली पाहिजे. त्यामुळे केंद्र सरकारने किमान 200 रुपयांनी तरी एफआरपी वाढवावा अशी मागणी शेट्टी यांनी केंद्राकडे केली आहे.

यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसाच्या एफआरपीसंदर्भात कोल्हापुरातील साखर कारखानदारांंशीही चर्चा केली होती. मात्र, ही बैठक निष्फळ ठरली होती. यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बैठकीतून निघून गेले. त्यामुळे ऊसदर निश्चितीसाठी आयोजित करण्यात आलेली पहिली बैठक निष्फळ ठरली. मात्र, ऊसासाठी एफआरपी वाढवून देणार नाही तोपर्यंत साखर कारखाने सुरु होऊन देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून देण्यात आला होता.

कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in