Glaucoma : ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास येईल कायमचे आंधळेपण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Glaucoma) लहानपणी तुम्हीसुद्धा आंधळी कोशिंबीर खेळले असाल. या खेळात एकदा डोळ्यांवर पट्टी बांधली की आपोआप आंधळेपण येतं. मग इतर सवंगड्यांना शोधताना होणारी धडपड आपल्याला डोळ्यांची अर्थात नजरेची किती गरज आहे ते दाखवून देते. आपले डोळे आपल्या शरीरातील अत्यंत महत्वाचा अवयव आहे. शिवाय फारच नाजूक आणि संवेदनशीलसुद्धा. डोळ्यांशिवाय आपल्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी अर्थहीन वाटू शकतात. संपूर्ण जगभराचे सौंदर्य न्याहाळण्यापासून ते दैनंदिन जीवनातील प्रत्येक गोष्ट करताना दृष्टीची गरज ही असतेच. पण अनेकदा आपण आपल्या आरोग्याची काळजी घेताना जी हेळसांड करतो त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य देखील खराब होते.

अनेक लोकांचं काम हे सतत कॅम्प्युटरच्या स्क्रीनवर असतं. शिवाय काही लोकांना सर्वाधिक वेळ मोबाईलवर घालवण्याची सवय असते. यामुळे डोळ्यांवर ताण येतो आणि तुम्हाला डोळ्यासंबंधित कोणतीही समस्या जाणवल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल. (Glaucoma) नाहीतर तुम्हाला तुमची दृष्टी गमवावी लागू शकते. आज तुम्हाला अशाच एका आजाराबाबत सांगणार आहोत. ज्यामध्ये लक्षणे वेळीच न समजल्याने कायमचे अंधत्व येऊ शकते.

आपण ज्या आजाराविषयी बोलतोय त्या आजाराला ‘काचबिंदू’ म्हणून ओळखले जाते. अर्थात ‘ग्लूकोमा’ (Glaucoma). हा डोळ्यांचा आजार आहे. ज्याला सर्वसामान्य भाषेत काचबिंदू म्हणून ओळखले जाते. देशभरात गेल्या काही वर्षांमध्ये काचबिंदूच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे, असे दिसून आले आहे. काचबिंदूमुळे डोळ्यांच्या ऑप्टिकल नर्व्हचे नुकसान होते आणि यामुळे कायमस्वरुपी दृष्टी जाण्याची शक्यता असते. म्हणून आज आपण काचबिंदू या आजाराविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. ज्यामध्ये काचबिंदूची लक्षणे कोणती असतात याविषयी जाणून घेऊ.

काचबिंदू म्हणजे काय? (Glaucoma)

‘काचबिंदू’ हा डोळ्यांचा आजार आहे. ज्यामध्ये डोळ्यांच्या ऑप्टिक नर्व्हचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे ऑप्टिक मज्जातंतू आपल्या डोळ्याच्या मागील बाजूस असतात. जे डोळ्यातून मेंदूला व्हिज्युअल सिग्नल देण्याचे आणि व्हिज्युअलायझेशनमध्ये मदत करण्याचे काम करतात. जर आपल्याला काचबिंदू झाला असेल तर या ऑप्टिक नर्व्हचे नुकसान होते. परिणामी कायमस्वरूपी आंधळेपण येऊ शकते. कारण या आजरात ऑप्टिक मज्जातंतूवर उच्च दाब येतो आणि यामुळे मज्जातंतूचे नुकसान होते. काचबिंदूच्या काही प्रकारांत रुग्णांमध्ये लक्षणे दिसत नाहीत. पण काहींमध्ये विशेष लक्षणे दिसून येतात. ती कोणती? हे जाणून घेऊ.

काचबिंदूची लक्षणे

दृष्टी अंधुक होणे
दृष्टी कमी होणे
डोळे दुखणे
सतत डोकेदुखी
डोळे लाल होणे
पोटदुखी
मळमळ आणि उलट्या

काचबिंदूची कारणे

अनुवांशिक कारणे
जन्मजात दोष
बोथट वा रासायनिक इजा
डोळ्यामध्ये जखम
तीव्र डोळा संसर्ग
डोळ्याच्या आतील रक्तवाहिन्यांद्वारे अडथळा
दाहक स्थिती
पूर्वी डोळ्यांच्या शस्त्रक्रिया

काचबिंदू होऊ नये म्हणून अशी काळजी घ्या

काचबिंदू हा आजार पूर्णपणे बरा होत नाही. (Glaucoma) त्यामुळे वेळीच लक्षणे लक्षात घेऊन त्यावर उपचार करणे गरजेचे असते. शिवाय काचबिंदू होऊ नये म्हणून आधीपासून काळजी घ्यावी. यासाठी,
वारंवार डोळ्यांची तपासणी करणे
आपल्या कुटुंबाच्या वैद्यकीय इतिहासाबाबत जागरूक राहणे
निरोगी जीवनशैली
जोखमीची कामे करताना डोळ्यांची विशेष काळजी घेणे.