पणजी । कोरोना विषाणूची लागण झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत आता गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश झाला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रमोद सावंत यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर प्रमोद सावंत यांनी घरातच विलगीकरणात राहत आहे. आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना त्यांनी योग्य ती काळजी घेण्यात आवाहन ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे.
प्रमोद सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “मी तुम्हा सर्वांना कळवू इच्छितो की, मला करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. मला करोनाची कोणतीही लक्षणं आढळत नसून घराचत विलगीकरणात राहत आहे. सध्या मी घरातूनच काम करत आहे. माझ्या जवळच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी”.
I wish to inform all that I have been detected COVID19 positive. I am asymptomatic and hence have opted for home isolation. I shall continue to discharge my duties working from home. Those who have come in my close contact are advised to take the necessary precautions.
— Dr. Pramod Sawant (@DrPramodPSawant) September 2, 2020
दरम्यान, गोव्यात सीमा आजपासून पर्यटकांसाठी आणि परराज्यातील लोकांसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. सोबतच राज्यातील आणि बार आणि रेस्तराँदेखील खुली करण्यात आली आहेत. प्रमोद सावंत यांनीच सोमवारी ही घोषणा केली आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं होतं की, केंद्र सरकारच्या नव्या गाइडलाइन्सनुसार मंगळवारपासून राज्याच्या नव्या सीमा खुल्या होतील. यामुळे सर्व वाहनांना गोव्या प्रवेश दिला जाणार असून त्यांची कोरोना चाचणी केली जाणार नाही.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.