Goa Forest Tourism : समुद्र सोडा, गोव्याच्या जंगलात आहे खरंखुरं साहस; येईल रोमांचक अनुभव

Goa Forest Tourism
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Goa Forest Tourism। गोवा म्हंटल कि तुम्हाला समोर दिसतो तो अथांग समुद्रकिनारा, रात्रीच्या नाईटलाइफ पार्ट्या आणि पोर्तुगीजांनी जतन केलेला समृद्ध सांस्कृतिक इतिहास…त्यामुळे पर्यटकांचे पाय संपूर्ण भारतातून गोव्याकडे वळतात. पण गोवा म्हणजे फक्त समुद्रकिनारे नव्हेत, गोवा म्हणजे फक्त पार्ट्या करण्यासाठीच ठिकाण नव्हे, तर गोव्यात आणखीही बरंच काही आहे ज्याची कल्पना कधी तुम्ही केली नसेल. बहुतेक पर्यटक सामान्यपणे गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांकडे आकर्षित होतात, परंतु खरंखुरं साहस तर गोव्याच्या निसर्गरम्य जंगलात आहे, जिथे तुम्ही फक्त एक रात्र जरी घालवली तरी तुम्हाला अनेक रोमांचक अनुभव येतील…. आणि खरीखुरी शांती मिळेल…

गोव्याचे जंगल (Goa Forest Tourism) हे केवळ झाडांचा संग्रह नाही, तर ती जीवनाने भरलेली एक समृद्ध परिसंस्था आहे.उंच नारळाचे झाडे, दाट खारफुटी आणि वटवृक्ष यांची एकत्र सांगड तुमच्यासाठी जणू एक छतच, जे सूर्याच्या किरणांपासून तुमचं रक्षण करेल. कॅम्पिंग साइटवर पोहोचणे हे एक साहस आहे. तुम्ही कितीही कमी जागेत ट्रेकिंग केलं किंवा खडबडीत रस्त्यावरून जरी गाडी चालवली तरी प्रत्येक स्टेजला तुम्हाला असं फील होईल कि आपण एका वेगळ्याच जगात आलोय. जंगलाचाही स्वतःचा असा एक वेगळाच माहौल आहे, तिथे तुम्हाला अचानकच घुबडांचा आवाज ऐकू येईल, लहानसहान प्राणी या झुडपातून त्या झुडपात फ़िरतांना दिसतील, मध्येच सशाचा आवाज तुमच्या कानावर पडू शको…. जणू काही ते सर्व प्राणी तुम्हाला हे सांगत असतील कि आम्हीच या जंगलाचे राजे आहोत..

संध्याकाळ होताच जंगलातील वातावरणही (Goa Forest Tourism) बदलतं. जंगलात कॅम्पिंग करणे हा एक रोमांचक अनुभव असला तरी तुम्हाला खरी शांतता इथेच मिळते. तुम्हाला तंबूत राहावं लागत, याठिकाणी शहरांसारखे वायफाय वगैरे नाही, किंवा लायटिंगचा झगमगाट नाही… त्यामुळे मोबाईलला थोडं दूर ठेऊन तुम्ही खऱ्या अर्थाने जंगलाशी, तिथल्या निसर्गाशी एकरूप होऊ शकता. जंगलातून राहून रात्री आकाशाकडे वर बघताच तुम्हाला एकदा स्वच्छ आणि सुंदर आकाश दिसेल, कारण त्याभागात कोणतेही प्रदूषण नाही, त्यामुळे अवकाशातील तारेही चांगलेच चमकलेले पाहायला मिळतील.. शेकोटीजवळ बसून एकमेकांना गोष्टी सांगत बसण्यात खरा आनंद आहे, पण बेडकांचा कर्कश आवाज, कोल्ह्यांचे किंचाळणे, पानांचे सळसळणे यामुळे तुमचं लक्ष्य विचलित होऊ शकत.

जंगलात राहण्याची सवय नसलेला व्यक्ती या एकूण परिस्थितीने सुरुवातीला भलेही घाबरलेला किंवा अस्वस्थ झालेला असू शकतो, पण एकदा का जंगलाशी एकरूप झालं कि मग त्यालाही त्या जंगलात राहण्याचा मोह सुटत नाही. जंगलाच्या मध्यभागी झोपणे ही अशी गोष्ट आहे जी तुम्ही कधी कल्पनाही करू शकत नाही. गोव्याच्या जंगलात एक अनुभवी साहसी व्यक्तीपासून ते पहिल्यांदाच कॅम्पर करणाऱ्यापर्यंत, रात्र घालवणे हा एक असा अनुभव आहे ज्याच्या आठवणी कायम जपल्या पाहिजेत

गोव्यातील टॉप जंगल पर्यटन- Goa Forest Tourism

१) कोटिगाव वन्यजीव अभयारण्य (Cotigao Wildlife Sanctuary)

हे अभयारण्य दक्षिण गोव्यात 86 चौरस किमी क्षेत्रात आहे. येथे हायना, स्लॉथ बेअर, भारतीय बायसन आणि मालाबार क्रेस्टेड ईगलसारखे पक्षी पाहायला मिळतात. जंगल ट्रेक आणि वन्यजीव निरीक्षण टूर तुम्हाला याठिकाणी करता येईल.

२) नेट्रावली वन्यजीव अभयारण्य (Netravali Wildlife Sanctuary)

हे सुद्धा जंगल दक्षिण गोव्यात नेट्रावली गावाजवळ आहे. हे अभयारण्य समृद्ध जैवविविधतेसाठी ओळखले जाते. येथे तुम्हाला सावरी धबधबा, घनदाट जंगल, काजू आणि कोकमच्या झाडांचे दृश्य आणि भारतीय गौर (बायसन) यांसारखे प्राणी पाहायला मिळतील.नेट्रावली जंगल ट्रेक हा एक गाइडेड ट्रेक आहे, जो पर्यटन आणि वन विभागाच्या सहकार्याने आयोजित केला जातो. यासाठी परवानगी आवश्यक आहे.

३) भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य (Bhagwan Mahavir Wildlife Sanctuary)

हे अभयारण्य दक्षिण गोव्यात पणजीपासून 53 किमी. अंतरावर आहे. याठिकाणी गाइडेड जंगल सफारी आणि दूधसागर धबधबा टूर करता येईल. तुम्हाला बिबट्या, स्लॉथ बेअर, हरण आणि विविध पक्ष्यांचे दर्शन होईल.