हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे दोन दिवसीय विशेष अधिवेशनात विधानसभाध्यक्ष निवड आणि बहुमत चाचणी होणार आहे. त्यापुर्वी बंडखोर आमदारांना (Rebel MLA) गोव्यातील हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. याच हॉटेलमधून गोवा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी (Rebel MLA) केल्यानंतर त्यांच्यासह बंडखोर आमदार (Rebel MLA) सुरतमार्गे गुवाहाटी आणि त्यानंतर गोव्यातील हॉटेलमध्ये थांबले होते. मात्र एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर बंडखोर आमदार मुक्कामी असलेल्या गोव्यातील हॉटेलमधून दोघांना अटक करण्यात आली आहे.
गोवा पोलिसांनी शनिवारी एका पुरुष आणि एका महिलेला राज्याच्या डोना पॉला येथील एका तारांकित हॉटेलमध्ये खोट्या ओळखीने राहण्याच्या आरोपाखाली अटक केली. या हॉटेलमध्ये महाराष्ट्रातील बंडखोर आमदारांचा (Rebel MLA) मुक्काम होता, एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली आणि ती महिला एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या त्यांनी आरोपींची नावे अध्याप उघड केलेली नाहीत. पणजीचे पोलिस निरीक्षक सूरज गवस यांनी सांगितले की, पकडलेले दोघेजण बनावट नावाने हॉटेलमध्ये दिवसभर थांबले होते आणि ओळख बदलल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.
फेक आयडीमुळे अटक
शिंदे गटाचे बंडखोर आमदार (Rebel MLA) थांबलेल्या ताज हॉटेलमध्ये हरियाणा आणि उत्तराखंड येथील दोन जण फेक आयडीच्या माध्यमातून थांबले होते. तर यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यामुळे ते हेरगिरी करत असण्याची शंका आल्याने गोवा पोलिसांनी दोघांना अटक केली. तर चौकशीदरम्यान तिघांचे ओळखपत्र फेक असल्याचे दिसून आले. मात्र त्यापुर्वीच बंडखोर आमदार मुंबईत होणाऱ्या विशेष अधिवेशन आणि बहुमत चाचणीसाठी मुंबईला रवाना झाले होते. ते सायंकाळी मुंबईत दाखल झाले. त्यानंतर रात्री ऊशीरा गोव्यातील ताज हॉटेलमधून दोघांना अटक केली.
हे पण वाचा :
Share Market ची वाटचाल पुढील आठवड्यात कशी असेल ???
Toyota ची Urbun Cruiser Hyryder लॉन्च; सेल्फ चार्जिंगचे दमदार फीचर्स
Yes Bank चे कर्ज महागले, बँकेकडून MCLR मध्ये करण्यात आली वाढ !!!
साताऱ्यात भरदिवसा डोक्यात गोळी घालून खून : आरोपी फरार
गेल्या आठवडाभर सराफा बाजाराची स्थिती कशी होती ??? जाणून घ्या