शिंदे-फडणवीस सरकारची आज अग्निपरीक्षा, विधानसभा अध्यक्षांची होणार निवड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – शिवसेनेत बंडखोरी करून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रिपदी झेप घेतली आहे. आता पहिल्यांदाच शिवसेनेचे आमदार आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे विधानभवनात आमनेसामने येणार आहे. राज्यपालांनी बोलावलेल्या विशेष अधिवेशनात आज अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी चांगलीच तयारी केली आहे. त्यामुळे राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीप्रमाणे याही वेळा फडणवीस बाजी मारणार का हे पाहण्याचे ठरणार आहे.

अध्यक्षपदासाठी भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून राजन साळवी यांना उमेदवारी
आज विधानसभा अध्यक्षांची निवडणूक पार पडणार आहे. भाजपकडून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून राजन साळवी यांना मैदानात उतरवले आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे सर्व आमदार रात्रीच मुंबईत दाखल झाले आहे. सर्व आमदारांचं ताज हॉटेलवर जंगी स्वागत करण्यात आले आहे. यावेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक कशी लढायची याबद्दल रणनीती ठरली आहे. एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी एकत्र मिळून ही रणनीती ठरवली आहे. भाजप आणि शिंदे गटाकडून स्वतंत्र्य व्हीप बजावण्यात आले आहे. जर विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीत भाजपचे राहुल नार्वेकर विजयी झाले तर शिंदे सरकारची कायदेशीर लढाईची वाट मोकळी होणार आहे.

कोण आहेत राहुल नार्वेकर ?
शिवसेनेतून राजकीय प्रवासाला सुरुवात
तीन वर्ष राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य
2019 च्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश
2019 साली कुलाबा मतदारसंघातून आमदार
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकरांचे जावई

कोण आहेत राजन साळवी ?
राजन साळवी हे शिवसेनेचे उपनेते आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार आहेत.
2009 पासून सलग तीन वेळा राजापूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केले आहे.

हे पण वाचा :
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या हॉटेलमध्ये बनावट नावाने राहणाऱ्या 2 जणांना अटक

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांची शिवसेनेतून हकालपट्टी

अमरावती हत्याकांडातील मास्टरमाईंडला अखेर अटक; CCTV फुटेजच्या आधारे करण्यात आली कारवाई

मणिपूरमधील भूस्खलनात 24 जणांचा मृत्यू तर 38 जण जखमी, लाईव्ह व्हिडिओ आला समोर

Stuart Broad ने कसोटी क्रिकेटमध्ये पूर्ण केले 550 बळी !!!

Leave a Comment