Gobi Manchurian And Cotton Candy Ban | ‘या’ कारणामुळे कर्नाटक सरकारने आणली कॉटन कँडी आणि कोबी मंचुरिअनवर बंदी, वाचा सविस्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gobi Manchurian And Cotton Candy Ban | आज काल लहान मुलांना तसेच मोठ्या माणसांना देखील बाहेरचे स्ट्रीट फूड खायला खूप आवडते. परंतु यामुळे आपल्या आरोग्याला अनेक धोका मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होतोn बाहेर बनवणारे पदार्थ हे आपल्याला खूप आकर्षक आणि चविष्ट लागतात. परंतु त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रंग तसेच केमिकल मिसळलेले असते. त्यामुळे त्या खाद्यपदार्थांना चांगली चव आलेली असते. त्याचप्रमाणे ते आकर्षक देखील दिसत असतात. बाहेर खास करून लोक कोबी मंचूरियन आणि कॉटन कँडी मोठ्या प्रमाणात खातात. या दोन्ही गोष्टी लोकांना त्यांच्याकडे त्यांच्या रंगामुळे खूप आकर्षित करतात. परंतु कोबी मंचुरियन आणि कॉटन त्यांनी बनवताना कृत्रिम रंगाचा वापर केला जातो. जो आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक असतो. (Gobi Manchurian And Cotton Candy Ban )

कर्नाटक सरकारने कोबी मंचुरियन आणि कॉटन कँडीमध्ये कृत्रिम रंग वापरण्यास बंदी घातलेली आहे. कारण कृत्रिम रंगांनी बनवलेले हे पदार्थ जरी आपल्याला आकर्षक आणि चविष्ट लागत असले, तरी ते आपल्या आरोग्यासाठी खूपच हानिकारक आहेत असे सांगून राज्य सरकारने या गोष्टींना बंदी घातलेली आहे कर्नाटकचे आरोग्य मंत्री गणेश गुंडूराव यांनी कोबी मंचुरियन आणि कॉटन कँडीच्या विक्रीवर राज्यात बंदी घातलेली आहे.

गोबी मंचुरियन आणि कॉटन कँडी 9Gobi Manchurian And Cotton Candy Ban ) तयार करताना कृत्रिम रंग वापरताना आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारचे उल्लंघन आढळल्यास किमान सात वर्षांचा तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांचा दंड होऊ शकतो, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

काय म्हणाले कर्नाटकचे आरोग्यमंत्री | Gobi Manchurian And Cotton Candy Ban

कोबी मंचुरियन आणि कॉटन कँडीच्या नमुन्यांमध्ये हानिकारक रसायने आढळल्यानंतर सरकारने हा आदेश जारी केला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्यभरातील भोजनालयांमधून गोळा केलेल्या 171 नमुन्यांपैकी 107 नमुने टार्ट्राझिन, सनसेट यलो, रोडामाइन-बी आणि कार्मोइसिन या असुरक्षित रसायनांचा वापर करून तयार करण्यात आले होते.

मात्र, काही खाद्यपदार्थांच्या विक्रीवर कोणतेही निर्बंध किंवा मनाई करण्यात आलेली नाही. यावर आरोग्यमंत्री म्हणतात की, “कोबी ही पौष्टिक भाजी आहे आणि लोकांनी ती खावी. आम्ही केवळ कृत्रिम आणि कृत्रिम रसायनांचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करत आहोत. त्याचप्रमाणे, रंगहीन कँडी (पांढरी) देखील विकण्यास परवानगी देण्यात आली आहे.”