हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना प्रश्न विचारण्यात आला होता की, तुम्ही गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत अधिक ऊर्जावान दिसत आहात. तुम्ही थकत का नाहीत?? यावर उत्तर देताना नरेंद्र मोदी म्हणाले की, “मी कन्व्हिन्स झालोय की मला नक्कीच परमात्म्यानं इथं पाठवलयं. हे ऐकून लोक माझ्यावर टीका करतील. पण ही ऊर्जा बायोलॉजिकल शरीराकडून मिळत नाही. ही ऊर्जा ईश्वराने मला दिली आहे. कदाचित त्याला माझ्याकडून काही काम करवून घ्यायचं असेल.”
त्याचबरोबर, “मी काहीच नाही. मी फक्त एक माध्यम आहे. जे ईश्वराने माझ्या रुपात घेण्याचं ठरवलं आहे. म्हणूनच मी ज्यावेळी काही करतो त्यावेळी माझ्या मनात विचार असतो की ईश्वरच माझ्याकडून हे काम करवून घेत आहे. त्यामुळे मी नावलौकिक किंवा बदनामीची कधीच चिंता करत नाही. मी पूर्णपणे ईश्वराला समर्पित आहे.” असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. सध्या नरेंद्र मोदी यांच्या याच वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
दरम्यान, देशामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. आता या लोकसभा निवडणुकीतील फक्त दोन टप्पे उरले आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शो, सभा पार पडत आहेत. या काळात त्यांनी विविध प्रसार माध्यमांना मुलाखतीही दिल्या आहेत. आताही एका मुलाखतीत बोलत असताना त्यांनी मला ईश्वराने पाठवले आहे असे म्हणले आहे. त्यामुळे त्यांचेहे वक्तव्य चांगलेच चर्चेचा भाग बनले आहे.