हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सर्वसामान्य नागरिकांच्याखिशाला आणखी बसणार आहे. त्यांना दुधासाठी जास्त खर्च करावा लागणार आहे. कारण अमूल कंपनीने दूधदरवाढ केल्यानंतर आता गोकुळनेही आपल्या दुधात 3 रुपयांनी वाढ केली आहे. मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यात कोल्हापूर जिल्हा दूध संघाकडून (गोकुळ) दुधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता म्हैशीचे दूध प्रतिलिटर 72 रुपयांवर झाले आहे.
महागाईमुळे सर्वसामान्यांचे कबंरडे मोडले असताना आता नवीन दूध दर वाढीचा पुन्हा सामान्यांना भुर्दंड बसणार आहे. गोकुळ दूध संघाने गाईच्या दूध दरात पुन्हा एकदा वाढ केली असून म्हैशीच्या दूधामध्ये लिटरमागे गोकुळने 3 रुपयांची वाढ केली आहे. तर गाईच्या दुधामागे 2 रुपये वाढ केलेली आहे.
मुंबईत गाईचं दूध 54 रुपये दराने मिळत होते. उद्यापासून हेच दूध 58 रुपये प्रतिलीटर दराने मिळणार आहे. सध्या म्हैस दुधाचा दर प्रतिलिटर 69 रुपये इतका आहे. उद्यापासून हेच दुध 72 रुपये दराने विक्री होणार आहे. दुसरीकडे गायीचे दूध 54 रुपये प्रतिलीटर इतक्या दराने मिळत होते. उद्यापासून गायीचे दूध 56 रुपये प्रतिलिटर दराने विक्री होणार आहे.
पुण्यात सध्या गोकुळचे म्हशीचे दूध प्रतिलिटर 70 रुपये दराने मिळत आहे. उद्यापासून ते 72 रुपये दराने मिळणार आहे. तर गायीचे दूध प्रतिलिटर 54 रुपये मिळत होते. आता गायीच्या दुधाचा दर 56 रुपये प्रतिलिटर इतका होणार आहे. कोल्हापुरातही गोकुळच्या दूध दरात वाढ करण्यात आली असून कोल्हापुरात म्हशीच्या दुधाचा दर 64 रुपये प्रतिलीटर इतका होता. उद्यापासून म्हशीचे दूध 66 रुपये दराने खरेदी करावे लागणार आहे. दुसरीकडे गायीचे दूध 48 रुपये दराने मिळत होते. आता ते 50 रुपये दराने मिळणार आहे.
अमूल कंपनीने आठवडाभरापूर्वी आपलू दूध दरवाढ जाहीर केली होती. अमूलचे ताजे अर्धा लिटर दूध 27 रुपये तर एक लिटर पिशवी 54 रुपयांना केली. तसेच अमूल गोल्ड म्हणजे फूल क्रीम दूधाची अर्धा लिटरची पिशवी 33 रुपयांना तर एक लिटरची पिशवी 66 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली.