गोकूळची निवडणूक होणारच ! कोरोनाग्रस्त ठरावदार पीपीई कीट घालून मतदान करणार ः पालकमंत्री

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर | सत्ताधारी गटाने निवडणूक रद्द करण्यासाठी कोर्टाची पायरी चढली होती. तेव्हा आता सत्ताधाऱ्यांनी प्रत्यक्ष निवडणूकीच्या रिंगणात उतरून निवडणूक लढवावी. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची निवडणूक होणारच आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सर्व अटी- शर्थीचे पालन करून 35 ऐवजी 70 केंद्रावर मतदान घेतले जाणार आहे. तसेच ज्यांना कोरोना झाला आहे, अशा ठरावदार  पीपीई कीट घालून मतदान करणार असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. याबाबत कसबा बावडा येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, गेले वर्षभर प्रशासन सर्व नियम अटी पाळून ही निवडणूक घेणार आहे. मतदारांना याचा त्रास होणार नाही. तालुकानिहाय मतदान आहे. त्यामुळे एका मतदान केंद्रावर 50 जण मतदान करतील. सकाळी 8 ते 5 यादरम्यान, मतदान प्रक्रिया होणार आहे. एका मतदान केंद्रावर 100 मतदान घेतले जाणार होते. परंतु न्यायलयाच्या आदेशानुसार आता पन्नासच घेतले जाणार आहे. त्यामुळे न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे दूध उत्पादकांनाचा आताच नैतिक विजय झाला आहे.

आता विरोधकांनी आता जागतिक न्यायालयाकडे जावू नये. आतापर्यंत उच्च न्यायालय झाले. सर्वाेच्च न्यायालय झाले, त्यामुळे जागतिक न्यायालयाकडे जावू नये, अशी मिश्किल टिप्पणीही आ. पाटील यांनी केली. ते म्हणाले, सभासदांची न्याय बाजु घेवून कोर्टाने हा निर्णय घेतला आहे. सत्तारूढ गटाने हा निर्णय मोठ्या मनाने मान्य करुन निवडणूकीला समोरे गेले पाहिजे. जे ठरावदार कोरोना पॉझिटिव्ह असतील तर शेवटच्या तासात त्यांना पीपीई किट घालून मतदान करता येणार आहे.

राजस्थानमध्ये झालेल्या मतदानात कोरोना झालेल्या आमदारांनी पीपीई किट घालूनच मतदान केले होते. पश्‍चिम बंगालचे मतदान झाले. लोकशाहीत निवडणूका स्विकारल्या आहेत. यातून जो निर्णय आहे, तो स्विकारला पाहिजे. राज्य शासनानेही सर्व नियम पाळून निवडणूक घेवू असे सांगितले आहेत. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्‍वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले उपस्थित होते.

नियम पाळून निवडणूक

न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणने ऐकूण घेतले. सर्वोच्च न्यायालयानेही निवडणूकीचे दोनच टप्पे राहिले आहेत. अशावेळेला निवडणूक थांबण्यापेक्षा कोरोना संसर्गाचे सर्व नियम शंभर टक्के पाळून निवडणूक घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करत गोकुळ निवडणूक घेतली जाईल, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

Leave a Comment